आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून ४८ तासांत केरळात, हवामान खात्याचा सुधारित अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मान्सूनच्या आगमनासाठी हवामान योग्य असल्याने येत्या ४८ तासांत केरळच्या किनारपट्टीवर तो दाखल होण्याची आशा आहे. हवामान खात्याने सुधारित अंदाजात ५ जूनपर्यंत मान्सून केरळात येण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी बुधवारी सांगितले, पाऊस कमी झाल्याच्या स्थितीत उत्पादनातील नुकसान कमी करण्यासाठी व अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणामांचा मुकाबला केला जाईल. सरकार या वर्षाअखेरपर्यंत नवीन पीकविमा धोरण आणण्याच्या दिशने
काम करत आहे.
सिंह म्हणाले, डाळींच्या महागलेल्या किमतीला नियंत्रण घालण्यासाठी आयातीतून देशात पुरवठा वाढवण्याचा विचार आहे. सध्या सरकारकडे ५८० जिल्ह्यांसाठी आपत्कालीन योजना तयार आहे.
संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार राज्ये व कृषी संस्थांच्या संपर्कात आहे. भारतीय शेती कमी पावसात तग धरू शकते. आम्ही जेव्हा सत्तेत आलो तेव्हा आम्ही अवर्षणजन्य परिस्थितीचा सामना केला. तथापि, आमच्या मंत्रालयाने नुकसानीचा तीव्रता कमी करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली. त्याच अनुभवाच्या आधारवर आम्ही यंदाच्या मान्सूनला सामोरे जाऊ.
बातम्या आणखी आहेत...