आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रिपल तलाकवरील निर्णय घटनापीठ घेणार, सुप्रीम कोर्ट 30 मार्चला करणार प्रश्न निश्चित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ट्रिपल तलाक, निकाह हलाला आणि मुस्लिमांतील बहुपत्नीत्व विषयाशीवरील निर्णय पाचसदस्यीय घटनापीठ करणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ उन्हाळ्याच्या सुटीत ११ मेपासून संबंधित याचिकांवर सुनावणी करेल.

सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने गुरुवारी केंद्र व अन्य पक्षांनी तयार केलेले तीन प्रकारचे मुद्दे जाणून घेतले. पीठाकडे पाठवण्यात येणारे प्रश्न ३० मार्चला निश्चित केले जातील. न्यायालयाने सर्व पक्षांना जास्तीत जास्त १५ पानापर्यंत लेखी बाजू अॅटर्नी जनरलकडे मांडण्यास सांगितले आहे. या खटल्यात केवळ कायदेशीर पैलूवरच विचार केला जाईल,असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे. सर्व पक्षांच्या एकाएका शब्दावर न्यायालय लक्ष देईल.
 
गंभीर विषय असल्यामुळे टाळता येणार नाही
ट्रिपल तलाक खूप गंभीर विषय आहे. याच्याशी संबंधित मुद्दे टाळता येणार नाहीत. केंद्राने तयार केलेेले सर्व कायदेशीर मुद्दे घटनात्मक विषयाशी संबंधित आहेत. त्यामुळे घटनापीठानेच याची सुनावणी केली पाहिजे - सरन्यायाधीश खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठ. 
 
केंद्राने उपस्थित केले हे चार मुद्दे
१) धार्मिक स्वातंत्र्याच्या आधारे ट्रिपल तलाक, हलाला व बहुविवाहास परवानगी दिली जाऊ शकते?
२) समानतेचा अधिकार, प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार व धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारात कोणास प्राधान्य दिले जावे?
३) घटनेच्या कलम १३ अंतर्गत पर्सनल लॉ कायदा मानला जाईल?
४) ट्रिपल तलाक, निकाह हलाला व बहुविवाह भारताने स्वाक्षरी केलेल्या आंतरराष्ट्रीय
कायद्यानुसार योग्य आहेत काय?
 
कायद्याबाहेर जाणार नाही : सुप्रीम काेर्ट
सुनावणीदरम्यान एका महिला वकिलाने शाहबानो प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला. त्यावर न्यायपीठ म्हणाले, कोणत्याही खटल्यात दोन पक्ष असतात. आम्ही ४० वर्षांपासून निकाल देत आहोत. आपणास कायद्यानुसार जावे लागेल. कायद्याबाहेर जाणार नाहीत. हे मुद्दे महत्त्वाचे असल्याने ते निश्चित करण्यासाठी शनिवार व रविवारीही काम करण्यास तयार असल्याचे न्यायपीठाने स्पष्ट केले.
 
बातम्या आणखी आहेत...