आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Children Face Social Boycott As Their Parents Died Of HIV

एचआयव्हीच्या संशयाने पाच मुले वाळीत; आईचा मृत्यू, मुलांना मरण यातना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतापगड- आई-वडिलांचे छत्र नसणारी मुले अनाथ ठरतात, परंतु उत्तर प्रदेशातील पाच मुलांवर एचआयव्हीने अनाथपण लादले आहे. एचआयव्हीची बाधा झाल्याच्या संशयाने झपाटलेल्या गावकर्‍यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकून त्यांना गावाबाहेर हाकलले.

प्रतापगडमध्ये राहणार्‍या या पाच मुलांना गेल्या दोन महिन्यांपासून अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागत आहेत. एचआयव्हीची बाधा झालेली असावी, असा संशय आल्याने नागरिकांनी त्यांच्यावर अजिबात दया दाखवली नाही. 7 ते 17 वर्षे दरम्यान असे या मुलांचे वय आहे. त्या अगोदर त्यांच्या आईचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाला होता. यातूनच गावातील लोकांना एड्स होण्याच्या भीतीने नागरिकांनी त्यांना अमानुष वागणूक दिली. त्यांना गावकुसाबाहेर हाकलून लावण्यात आले.

अनेक दिवसांपासून आयुष्याची फरपट सुरू आहे. म्हणूनच आई-वडिलांच्या मृत्यूपेक्षा ‘जगण्याने छळले’ असा अनुभव या निष्पाप मुलांनी घेतला आहे. ज्यांना त्यांच्याविषयी दया वाटली त्यांनी या मुलांना गुपचूप आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यांना लपूनछपून जेवण पुरवले.

फाटके छत
गावकर्‍यांच्या वागणुकीमुळे जगणे असह्य झालेल्या मुलांनी आई-वडिलांच्या कबरीजवळ आसरा शोधला. तेथेच फाटक्यातुटक्या पोत्याचे छत तयार केले. या छताखाली ही अनाथ भावंडे काही दिवसांपासून आपला रोजचा दिवस कसाबसा ढकलू लागली होती.