आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हनी ट्रॅप’ रचून महिलेची 5 कोटींची मागणी; भाजप खासदारांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - एका महिला वकिलानेच हनी ट्रॅप रचून, आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे काढून ५ कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा खळबळजनक आरोप गुजरातेतील वलसाडचे भाजप खासदार के. सी. पटेल यांनी केला आहे. सदर महिला आपणास अडकवणार असल्याची धमकी देत होती, असे पटेल म्हणाले. या महिलेने खासदाराने बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली.  
 
गुजरातेतील वलसाडचे खासदार के. सी. पटेल यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी महिला वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.  प्राथमिक तपासात महत्त्वपूर्ण धागेदाेरे हाती लागले असून आरोपी महिलेस व तिच्या साथीदारास लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.  त्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.  
 
महिलेने चहात गुंगीचे औषध मिसळले, बेशुद्ध झाल्यावर आक्षेपार्ह चित्रे : खासदारांचा आरोप  
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत गुजरातच्या वलसाडचे खा. के. सी. पटेल यांनी सांगितले :  त्या महिलेने माझ्याकडे काही मदत मागितली होती. त्यानंतर तिच्या इंद्रापुरम येथील निवासस्थानी चहासाठी निमंत्रण दिले. त्या चहात गुंगीचे औषध टाकले. मी बेशुद्ध पडल्यानंतर आक्षेपार्ह स्थितीत काही छायाचित्रे काढली.  तसेच एक व्हिडिओ तयार केला. तो दाखवून माझ्याकडे ५ कोटी रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास ही छायाचित्रे, व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. तसेच बलात्काराच्या खटल्यात अडकवणार असल्याचे म्हटले. त्यामुळे आपण २८ एप्रिल रोजी दिल्ली पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. नॉर्थ अॅव्हेन्यू पोलिस ठाण्याने २९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यांच्याच तक्रारीवरून ही कारवाई करण्यात येत आहे, असे खा . पटेल यांनी सांगितले.  
 
 खासदाराने डिनरला बोलावून फ्लॅटवर केला बलात्कार : महिलेची तक्रार  
हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी महिलेने खासदारावर बलात्काराचा आरोप केला आहे. एका वकिलाद्वारे तिने आरोप केला की, नॉर्थ अॅव्हेन्यू पोलिसांनी खासदाराच्या दबावामुळे माझी तक्रार दाखल करून घेतलेली नाही. त्यानंतर मी पतियाळा हाऊस न्यायालयात गेले. न्यायालयाच्या एसएचओने  गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिल्याचा दावा त्या महिलेने केला. १२ मे रोजी संपूर्ण अहवाल मागवला आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, खासदारास एका खटल्याच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाची आवश्यकता होती. यानिमित्ताने त्यांची भेटही झाली. ३ मार्च रोजी खासदारांनी तिला नर्मदा अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये डिनरसाठी बोलावले. येथेच माझ्यावर बलात्कार केला, असा तिचा आरोप आहे. 
 
याआधीही  खासदारांच्या विरोधात त्या महिलेच्या तक्रारी : विशेष पाेलिस आयुक्त
दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त मुकेशकुमार मीणा यांनी सांगितले :  खा. पटेल यांच्या तक्रारीवरून त्या महिलेच्या विरोधात नॉर्थ अॅव्हेन्यू पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तपासांती समजले की, सदर महिलेने काही खासदारांच्या विरोधात तक्रारी दिल्या आहेत. तथापि, नंतर त्या परत घेण्यात आल्या होत्या. महिलेच्या तक्रारीवरून पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे प्रकरण एक बनावट  व विचारपूर्वक रचलेला कट वाटतो आहे. 
 
या प्रकरणाचा संपूर्ण तपास व लवकरच कारवाई : मीणा  
महिलेच्या तक्रारीचा तपास सुरू आहे. या महिलेने याआधीही काही खासदारांच्या विरोधात तक्रारी दिल्या होत्या. नंतर त्या माघारी घेण्यात आल्या.  महिलेच्या विरेाधात अद्याप तरी गुन्हा दाखल झालेला नाही, असे विशेष पोलिस आयुक्त मीणा म्हणाले.
 
पुढील स्लाइडवर वाचा, सरन्यायाधीशांविरुद्धच अटक वॉरंट काढण्याचे न्या. कर्णन यांचे आदेश!...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...