आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Miscreants Arrested On Train After Tweet To Suresh Prabhu For Harassment

गर्भवती महिलेची रेल्‍वेत काढली छेड, पतीच्‍या \'ट्‍वीट\'नंतर मदतीला धावले \'प्रभू\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच आरोपींना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. - Divya Marathi
पाच आरोपींना पोलिसांनी ताब्‍यात घेतले.
नवी दिल्‍ली - रेल्‍वेमध्‍ये एका गर्भवती महिलेची छेड काढल्‍याप्रकरणी 5 युवकांना धनबाद रेल्‍वे स्‍थानकावर अटक करण्‍यात आली. एक दाम्‍पत्‍य अजमेर-सियालदह एक्सप्रेसने गया येथे जात असताना काही युवकांनी महिलेची छेड काढली. एवढेच नव्‍हे तर महिलेच्‍या छेडछाडीला विरोध करणा-या पतीलाही त्‍यांनी मारपीट केली. दाम्‍पत्‍याला गया स्‍टेशनवर उतरू दिले नाही....

- मीडिया रिपोर्टनुसार, गयामध्‍ये राहणारे पती- पत्‍नी मंगळवारी अजमेरहून घरी परतत होते.
- दरम्‍यान त्‍यांच्‍या कोचमध्‍ये असलेले काही युवक कोल्‍ड ड्रिंकमध्‍ये दारू मिसळून पित होते.
- या महिलेवर त्‍यांनी काही कमेंटही केल्‍या.
- या युवकांनी गर्भवती महिलेची छेड काढल्‍याचा आरोप आहे.
- पतीने टीटीला आग्रा आणि कानपूर स्‍थानकावर मदत मागितली.
- इतर प्रवाशांनीही टीटीकडे तक्रार केली मात्र कोणतिही कारवाई झाली नाही.
- या दाम्‍पत्‍याने गया स्‍थानकावर उतरण्‍याचा प्रयत्‍न केला तेव्‍हा त्‍यांना युवकांनी अडवले.
- नंतर या महिलेच्या पतीने रेल्‍वे मंत्री सुरेश प्रभु यांना ट्विट करून मदत मागितली.
- नंतर ट्रेन जशी धनबाद स्‍टेशनवर पोहोचली, तसे आरपीएफने या पाचही आरोपींना अटक केले.
पुढे पाहा, संबंधित फोटो....