आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS : या 10 कारणांमुळे AAP ने दिल्लीत केला सगळ्यांचाच \'सुपडा साफ\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आपच्या त्सुनामीमध्ये इतर सर्वच राजकीय पक्षांचा सुपडा साफ झाला. भाजपला तीन जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. पण अरविंद केजरीवाल यांच्या या पक्षाला एवढा मोठा विजय मिळवणे कसे शक्य झाले. आपच्या या त्सुनामीमागची कारणे काय याचा आढावा घेऊयात...
1. केजरीवाल यांची लोकप्रियता
केजरीवाल यांनी केवळ पक्षाचे नाव आम आदमी पार्टी असे ठेवले नाही, तर तेही नेहमी आम आदमी सारखेच राहिले, त्याचाच लोकांवर प्रभाव पडला. विशेष म्हणजे त्यांना समाजातील प्रत्येक वर्गाचे समर्थन मिळाले मग तो एलिट क्लास असो वा तरुण. अल्पसंख्याक आणि दलितांनीही केजरीवाल यांना भरभरून प्रेम दिले. प्रत्येक जण त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा असल्याचे दिसले. गर्दीतही केजरीवाल यांची आम आदमीची प्रतिमा आणि व्हिआयपी कल्चरपासून दूर राहणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य ठरले आहे.
2. भ्रष्टाचाराविरोधात कडक भूमिका
‘आप’साठी सकारात्मक ठरलेली आणखी एक बाब म्हणजे, भ्रष्टाचाराच्या विरोधात असलेली कडक भूमिका. पोलिसांची हप्ता वसुली, एमसीडीमधील भ्रष्टाचार असो वा व्यापाऱ्यांना विक्री कर अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास, या सर्वांच्या बाबतीत ‘आप’ ने गेल्यावेळी 49 दिवसांच्या सरकारच्या कार्यकाळात अत्यंत कडक भूमिका घेतली होती. त्यामुळेच भाजपचा बिझनेस क्लास आणि पारंपरिक मतदार ‘आप’ बरोबर गेला.

3. मोदींचा विजयरथ थांबला
2014 च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर अनेक राज्यांमध्ये भाजपने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर मोदींचा विजयरथ थांबवणे अत्यंत कठीण आहे अशीच स्थिती निर्माण झाली होती. पण दिल्लीकरांच्या मनात काहीतरी भलतेच होते. दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी ‘आप’ भाजपपेक्षा अधिक उपयुक्त पर्याय ठरू शकेल, असे मतदारांना वाटले. भाजपच्या काही नेत्यांची प्रक्षोभक भाषा आणि त्याबाबत मोदींचे मौन यामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला. सुरक्षेच्या कारणांमुळेही मोदी लोकांपासून दुरावले. केजरीवाल मात्र त्या तुलनेत लोकांच्या अधिक जवळ आहेत. हा फॅक्टर कामी आला.
4. बेदी कार्ड चालले नाही
ऐन निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने किरण बेदींना मैदानात उतरवत मास्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो पुरता फसला. बेदी स्वतःदेखिल विजयी होऊ शकल्या नाही. भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे हा प्रकार घडल्याच्याही चर्चा आहेत. पण केजरीवाल यांच्या तुलनेत किरण बेदींचे कार्ड चालले नाही, हेही सत्य आहे. भाजपचे स्थानिक नेते 16 वर्षांपासून सत्तेची वाट पाहत होते. पण पक्ष नेतृत्त्वाने किरण बेदींना आणत त्यांची स्वप्ने धुळीस मिळवली. अखेरच्या क्षणी खेळलेला हा डाव भाजपला चांगलाच महागात पडला.
इतर कारणांविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...