नवी दिल्ली - येथील शहादराच्या गांधी परिसरातील एका खासगी शाळेत 5 वर्षीय मुलीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. 40 वर्षांचा आरोपी चपराशी विकास याला अटक करण्यात आली आहे. शहादरा पोलिसांनी याची माहिती दिली. पीडितेने सांगितले की, आरोपीने कॅप घातलेली होती. याच आधारे त्याची ओळख पटवण्यात आली. तथापि, नुकताच 8 सप्टेंबर रोजी गुडगावच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये कंडक्टरने 7 वर्षांच्या बालकावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न आणि नंतर गळा चिरून खून केला होता.
3 वर्षांपासून शाळेत काम करतोय विकास
- वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी सांगितले की, मागच्या 3 वर्षांपासून विकास शाळेत काम करत आहे. अगोदर तो याच शाळेत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा.
- शनिवारी सकाळी 11.15 वाजता विकासने चिमुकलीला शाळेच्या रिकाम्या खोलीत नेले. ही चिमुकली तेव्हा नुकतीच शिक्षकाला लंच बॉक्स देऊन कॉरिडॉरमधून परत येत होती.
असे समोर आले प्रकरण
- मुलीने आपल्या आईला रक्तस्राव आणि खूप दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
- पोलिस सूत्रांनुसार, तपासामध्ये कळले की मुलीवर बलात्कार झाला आहे. सध्या चिमुरडीचे समुपदेशन सुरू आहे.
- समुपदेशनादरम्यान मुलीने सांगितले की, रेप करणाऱ्याने कॅप घातलेली होती. मुलीने आरोपीची इतर ओळखही सांगितली. याच आधारे त्याला अटक करण्यात आली आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...