आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Soldiers Firing To Give Cover Fire To Militant, Says BSF

50-60 दहशतवादी J&K मध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात, त्यांना कव्हर देण्यासाठी पाकिस्तानकडून फायरिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाक व्याप्त काश्मिरातून 50-60 दहशतवादी भारतीय भूमिवर घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना कव्हर फायर देण्यासाठी पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर जोरदार गोळीबार केला जात आहे, अशी खळबळजनक माहिती 'बीएसएफ'चे इन्स्पेक्टर जनरल राकेश शर्मा यांनी दिली.
परंतु, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय जवान सज्ज आहेत. त्यासाठी उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत, असे राकेश शर्मा यांनी सांगितले.
शर्मा म्हणाले, की भारतीय जवानांनी जागता पहारा ठेवला असल्याने या दहशतवाद्यांना भारतीय भूमिवर घुसखोरी करणे अशक्य होऊन बसले आहे. यामुळे आलेल्या अपयशातून पाकिस्तानी लष्कराचे जवान भारतीय चौक्यांना लक्ष्य करीत आहेत. यात बीएसएफचा एक जवान शहिद झाला असून एक जखमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर करण्यात आलेल्या गोळीबाराचा आम्ही कठोर शब्दांत पाकिस्तानकडे निषेध नोंदविणार आहोत.
पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले जात आहे. सांभा भागातील रेगल पोस्ट परिसरात दोन्ही लष्करांत झालेल्या गोळीबारात पाकिस्तानी रेंजर्सचे चार जवान ठार झाले आहेत.
यापूर्वीही पाकिस्तानने शस्त्रसंधिचे उल्लंघन करीत भारतीय सीमा चौक्यांवर गोळीबार केला होता. त्यात दोन्ही पक्षांचे नुकसान झाले होते. यावेळीही भारताने जशास तसे अशी भूमिका घेतल्याने पाकिस्तान चिडला होता.
दरम्यान, इस्लामाबादमधील भारतीय राजदुताला पाकिस्तान सरकारने समन्स बजावले आहे. भारतीय लष्कराकडून शस्त्रसंधिचे उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, पाकिस्तान लष्कराने भारतीय भूमिवर केलेल्या गोळीबाराच्या खाणाखुणा... झालेले नुकसान...