आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या हरप्रीतकडे 50 कोटींचे ड्रग, धावपटूसह दोन जण अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यूथ कॉमनवेल्थ गेम्स-२००४ मध्ये देशाला रौप्यपदक मिळवून देणारा हरप्रीतसिंग आणि त्याचा साथीदार अमरदीपसिंग यास दिल्ली पोलिसाच्या स्पेशल सेलने ५० कोटी रुपयांच्या ड्रगसह अटक केली आहे.  हे दोघे दिल्लीतील शिवनगर, जेल रोड येथील रहिवासी आहेत.
 
हे अमली पदार्थ मुंबई व दिल्लीतील रेव्ह पार्ट्यामध्ये पुरवत होते, अशी माहिती हाती मिळाली आहे. १५ फेब्रुवारी रोजी दोघे दादर-अमृतसर एक्स्प्रेसने २५ किलो मॅफेड्रॉन घेऊन नवी दिल्लीच्या रेल्वेस्थानकावर उतरले. तेव्हाच त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबानुसार दिल्लीतील विकासपुरी येथे राहणाऱ्या हनीश सरपाल यास ६५० ग्रॅम अमली पदार्थासह अटक केली.
 
मॅफेड्रॉनला अमली पदार्थाच्या विक्रेत्यामध्ये म्यांऊ-म्यांऊ नावाने ओळखले जाते. स्पेशल सेलचे उपायुक्त संजीवकुमार यादव यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक टिळक चांद यांना मुंबईहून म्यांऊ-मण्यांची कन्साइनमेंट येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. स्पेशल सेलने नाकेबंदी लावली होती. 

 
हरप्रीतने जिंकली दोन पदके : अमली पदार्थाच्या तस्करीमध्ये उतरण्याआधी हरप्रीत देशातील प्रख्यात खेळाडू गणला जात असे. डिस्क थ्रोमध्ये त्याने देशाला दोन पदके मिळवून दिली. २००४ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या यूथ कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्यपदक आणि २००६ मध्ये कोलंबो येथे सैफ गेममध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर त्याने आणखी काही राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेतलेला होता. कॉमनवेल्थ गेम्स २०१० मध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला खेळ सोडावा लागला.  
 
लंडनमध्ये अमली पदार्थाच्या तस्करांशी अमरदीपची ओळख : अमरदीपने सांगितले, २००६ मध्ये हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझममध्ये पदविका घेतल्यानंतर लंडनला गेलो. तेथे त्याची ओळख हनीश आणि किशन यांच्याशी झाली. हनीश दिल्लीतील विकासपुरीचा तर किशन राजस्थानातील नागोरचा रहिवासी आहे. लंडनमध्ये कायमस्वरूपी नोकरी न मिळाल्याने अमरदीप दिल्लीत परतला आणि  ड्रग व्यवसायात अडकला.

ऐषाआरामासाठी अमली पदार्थविक्रीचा मार्ग
खेळ सोडल्यानंतर हरप्रीतने मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. २०१३-१४ मध्ये त्याला मोठा तोटा झाला. आर्थिक अडचणीमुळे संकटाशी सामना करता करता अमरदीपचे ऐषाआरामाचे राहणे त्याला खुणावत होते. त्याच्यासोबतच तोही या धंद्यात सहभागी झाला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...