नवी दिल्ली - 500-1000 च्या जुन्या नोटा बंद झाल्याने त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी लोक आता विविध प्रकारचे मार्ग शोधत असल्याचे समोर आले आहे. कोणी या पैशातून सोने खरेदी करत आहे तर कोणी महागडी तिकिटे बूक करत आहेत. काही लोक लग्नाच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर याचा दबाव निर्माण करत आहे. तर काळा पैसा बाळगणारे काही लोक भितीपोटी पैसे फेकून देत आङेत. मात्र मोठे खर्च किंवा खरेदी करणाऱ्यांवर सरकारची नजर राहणार आहे. देशातील 25 शहरांमध्ये नोटांच्या मोबदल्यात 250 किलो सोने विकलेल्या 600 ज्वेलर्सना डायरेक्टरेट जनरल ऑफ सेंट्रल एक्साइज इंटलिजन्सने नोटिस पाठवून उत्तर मागितले आहे.
13-14 पटीने वाढले एसी-1 कोचचे बुकींग
- रेल्वेच्या फर्स्ट क्लासचे तिकिटबूक करुनही जुन्या नोटा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोक तिकिट बूक करून नंतर पुन्हा ते कँसल करत आहेत. त्यामुळे त्यांच्या नोटा एक्सचेंज होत आहेत.
- रेल्वेने कॅश रिफंड न करता अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणार असल्याचे म्हटले आहे, मात्र लोकांना तेही मान्य आहे.
- मुंबईत इंडियन रेल्वेचे स्पोक्सपर्सन अनिल सक्सेना यांनी सांगितले की, पूर्वी एसी फर्स्ट क्लासच्या 2000 तिकिटांचे बुकींग व्हायचे. हाच आकडा आता 27000 वर आहे. यात 13 पटींनी वाढ झाली आहे.
पुढे वाचा बंद नोटांचे असेच काही किस्से...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्षे तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्षे तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)