आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षांत 500% वाढली नेत्यांची संपत्ती; केंद्र सरकारच्या दिरंगाईवर सर्वोच्च न्यायालय नाराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काही नेत्यांच्या संपत्तीत ५ वर्षांत ५०० टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, केंद्र सरकारने याबाबत केलेल्या कारवाईची सर्वोच्च न्यायालयास माहिती दिली नाही. सरकारच्या या लेटलतिफीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.  खासदार, आमदारांच्या उत्पन्नाच्या स्रोतांचा खुलासा करण्यासंदर्भात लोकप्रहरी या सामाजिक संस्थेने याचिका दाखल केली आहे. संस्थेने एडीआरच्या एका अहवालाचा हवाला देत म्हटले की, एका आमदाराची संपत्ती २१००%, आसामच्या एका अन्य आमदाराची संपत्ती १२० % आणि २२ खासदारांची संपत्ती ५०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढली आहे. 
बातम्या आणखी आहेत...