आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजार कोटींचे मनी लाँडरिंग; व्यावसायिक गगन धवन अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाच हजार कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने व्यावसायिक गगन धवनला बुधवारी अटक केली. बँकांची ५ हजार कोटींनी फसवणूक संदेसरा ग्रुपने केल्याचा आरोप आहे. 

ईडीने २५ ऑगस्टला दिल्लीचे माजी काँग्रेस आमदार सुमेश शौकीन व धवनच्या १२ ठिकाणी धाडी घातल्या होत्या. बडोद्याची स्टील कंपनी स्टर्लिंग बायोटेकच्या बँक कर्जाच्या फसवणुकीत धवनने मदत केली होती. इतर काही अवैध व्यवहारांमुळेही तो रडारवर होता. सीबीआयने स्टर्लिंग बायोटेक व संचालक चेतन जयंतीलाल संदेसरा, दीप्ती चेतन संदेसरा, राजभूषण दीक्षित, नितीन संदेसरा आणि विलास जोशींसह इतरांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते.  
 
लाच दिल्याचा आरोप
धवनने प्राप्तिकर खात्याच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोपांचीही चौकशी होत आहे. धवनने इथिओपियासह अनेक देशांतील कंपन्यांद्वारे काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप केला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...