आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक पिशवी बाळगल्यास 5 हजारांचा दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राजधानीत आता ५० मायक्रॉनपेक्षा पातळ प्लास्टिक पिशवी बाळगल्याचे आढळून आल्यास पर्यावरणविषयक दंड म्हणून ५ हजार रुपये वसूल केले जाणार आहेत, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत.  

एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांनी पर्यावरणासंबंधी दंडाची रक्कम भरावी लागेल, असे स्पष्ट केले. यासंबंधी योग्य ती खबरदारी घेण्यासाठी लवादाने दिल्ली सरकारला काही महत्त्वपूर्ण सूचनादेखील केल्या आहेत. त्याचबरोबर आपच्या नेतृत्वाखालील सरकारने स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन याबद्दल आतापर्यंत केलेल्या उपाययोजनेबाबतचे शपथपत्र सादर करण्यासह लवादाने सांगितले आहे. 

दरम्यान, एनजीटीने १ जानेवारी २०१७ रोजी दिल्लीत विघटन होऊ न शकणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणली होती. त्याचबरोबर सरकारला त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना केली होती. भाजीपाला विक्रेत्यांकडून अशा पिशव्या बाळगल्याचे आढळून आल्यास त्यांची गय केली जाऊ नये. त्यांच्याकडून किमान १० हजार रुपये दंड वसूल करण्यात यावा, असे एनजीटीने म्हटले आहे.  दिल्लीतील आप सरकारला देशाच्या राजधानीतील सर्व प्लास्टिक कचरा आठवडाभरात हटवावा लागेल.

हॉटेल, रेस्तराँ, खासगी  कार्यक्रमांवर नजर  
एनजीटीच्या सूत्रांच्या मते, लवादाने दिल्ली सरकारला हॉटेल, रेस्तराँ, खासगी कार्यक्रमात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. त्यामुळे त्यावर करडी नजर ठेवण्याचे आदेशही एनजीटीने दिल्याचे सांगण्यात आले.  

सरकारची कानउघाडणी  
राष्ट्रीय राजधानी असतानाही शहरातील कचरा व्यवस्थापन आणि इतर गोष्टींची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जात नाही. त्यावरून ३१ जुलै रोजी लवादाने दिल्ली सरकारची चांगली कान उघाडणी केली होती. दिल्ली सरकार भेदभावाची वागणूक देत असल्याबद्दल दिल्ली सरकारला फटकारले.  
बातम्या आणखी आहेत...