आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बचाव मोहीमेनंतरही देशात 8 महिन्यांत 51 वाघांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वाघ बचाव मोहीम मोठ्या पातळीवर राबवण्यात येत असली तरी गेल्या काही महिन्यांत विविध राज्यांत 51 वाघांचा मृत्यू झाल्याचे वास्तव समोर आले आहे. पर्यावरण व वनमंत्री जयंती नटराजन यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. 26 ऑगस्टपर्यंत देशातील विविध राज्यांत वाघांचे मृत्यू रोखण्यात अपयश आले आहे. त्यातील आठ वाघांचा शिकारीमुळे मृत्यू झाला आहे. सहा वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला. 37 वाघांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. कर्नाटकमध्ये 13, महाराष्ट्रात 9 वाघांचा मृत्यू झाल्याचे नटराजन यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. उत्तर प्रदेशातील भैरिच जिल्ह्यात एक हत्ती अपघातात ठार झाला. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर नटराजन यांनी स्पष्टीकरण दिले. त्यात वाघांच्या मृत्यूचा आकडा स्पष्ट केला.