आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील ५५ हजार गावे मोबाइल संपर्क क्षेत्राबाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरातील साधारणत: ५५ हजार खेडेगावात अद्याप कोणत्याही मोबाइल कंपनीचे कव्हरेज पोहोचलेले नाही. यातील सर्वाधिक गावे ओडिशा राज्यात आहेत, अशी माहिती दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. उपलब्ध निधीनुसार टप्प्या टप्प्याने संबंधित भागात मोबाइल संपर्क यंत्रणा उभारली जाईल,असेही स्पष्ट करण्यात आले.
सरकारने मोबाइल संबंधीच्या विकासाचा एक कालबद्ध कार्यक्रम आखला असून याअंतर्गत ईशान्य राज्ये, सागरी बेटे आणि जम्मू - काश्मीर, हिमाचल प्रदेश यासारख्या हिमालयीन क्षेत्रातील राज्यांना पहिल्या टप्प्यात प्राधान्यक्रम देण्याचे ठरवले आहे. ओडिशात संपर्क क्षेत्र नसलेली सर्वाधिक म्हणजे १० हजार ३९८ खेडेगावे आहेत. यानंतर झारखंड ५,९४९, मध्य प्रदेश ५९२६, छत्तीसगड ४०४१ आणि आंध्र प्रदेश ३,८१२ यांचा समावेश होतो. सिन्हा यांनी आगामी काळात नवीन ४०० टपाल कार्यालये सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. त्यापैकी ३४४ टपाल कार्यालये सुरूही झाली आहेत.
बातम्या आणखी आहेत...