आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साठेबाजांवर छापासत्र; ५८०० टन डाळ जप्त - केंद्राची धडक कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डाळींची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध केंद्र सरकारने धडक कारवाई करत छापे टाकले. या छाप्यात पाच राज्यांत ५८०० टन डाळ जप्त करण्यात आली. तेलंगणमधून २५४९ टन, मध्य प्रदेशातून २२९५, आंध्र प्रदेशातून ६०० , कर्नाटकातून ३६० टन व महाराष्ट्रातून १० क्विंटल डाळ जप्त केल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.

भाव घसरेनात : भाववाढ नियंत्रणाचे प्रयत्न होत असले तरी डाळीचे भाव उतरण्याचे नाव घेत नाहीत. मंगळवारी किरकोळ बाजारात तूर डाळ २१० रुपये तर उडीद डाळीचा भाव १९८ रुपये किलोवर पोहोचला. दक्षिण भारतात तूर डाळ जास्त कडाडली. मुंबईत तूर डाळीचा भाव १७८ रुपये किलो होता.