आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी डॉक्टरसह 6 भारतीयांची ISIS च्या तावडीतून सुटका, सुषामांनी केली अधिकाऱ्यांची प्रशंसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लीबियामध्ये एका डॉक्टरसह 6 भारतीयांना आयएसआयएसने बंदिवान केले होते. भारताने त्यांची सुटका केली आहे. स्वतः सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. त्यासोबत लीबियामधील या मिशनवरील भारतीय अधिकाऱ्यांचेही त्यांनी कौतूक केले आहे. स्वराज यांनी सांगितले, बंदीवानांपैकी डॉ. राममूर्ती कोसानम यांना गोळी लागली होती. 
 
लवकरच सर्वांना भारतात आणणार
- स्वराज यांनी ट्विट करुन सांगितले, की लीबियामध्ये बंदी बनवून ठेवलेल्या सहा भारतीयांची सुटका करण्यात आली आहे.
- बंदीवानांपैकी डॉ. राममूर्ती कोसानम एक होते. त्यांना एक गोळी लागली होती. लवकरच त्यांना भारतात आणले जाणार आहे. 
- या मोहिमेत सहभागी भारतीय अधिकाऱ्यांचे स्वराज यांनी अभिनंदन केले आहे. 
 
18 महिन्यापूर्वी डॉ. कोसानम यांचे अपहरण 
- डॉ. राममूर्ती कोसानम यांचे जवळपास 18 महिन्यापूर्वी अपहरण झाले होते. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. ते आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्हातील रहिवासी आहेत. 
- एका रिपोर्टनुसार, डॉ. कोसानम लीबियामधील सिर्ते येथे एका हॉस्पिटलमध्ये फिजिशियन होते. आयएसच्या एका टोळीने इंजिनिअर सामल प्रवाश रंजनसह 9 भारतीयांचे 8 सप्टेंबर 2015 रोजी अपहरण केले होते.  
- तेव्हापासूनच भारतीय अधिकारी यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होते. 
- डॉ. कोसानम 1999 पासून लीबियामध्ये राहातात. 
 
भारतीयांना लीबिया सोडण्याचे आवाहन 
- भारतीय अधिकाऱ्यांनी लीबियामधील भारतीय नागरिकांना वेळोवेळी लीबिया सोडण्याचे आवाहन केले आहे. 
       
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...