आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजधानी दिल्लीत दिवसभरात होतात सहा बलात्कार; गुन्हेगारीत 50 टक्क्यांनी वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत महिला असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नरेंद्र मोदी आज (सोमवार) पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. दुसरीकडे दिल्लीत दिवसाकाठी सहा बलात्काराच्या घटना घडत असल्याचे खुद्द पोलिसांनी जाहीर केले आहे.

दिल्ली पोलिसांनी जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, 2014 मधील चार महिन्यांचा आघावा घेतला असता, दिल्लीत दिवसाभरात सहा बलात्कार तर 14 लैंगिक शोषणाविरोधात खटले दाखल होतात. यापैकी 90 ठक्के खटले निकाली काढल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला असला तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत बलात्काराच्या घटनेत 50 टक्क्याने वाढ झाली आहे.

दिल्ली मध्ये 1 जानेवारी ते 30 एप्रिल दरम्यान बलात्काराचे 616 आणि अत्याचाराचे 1,336 खटले दाखल करण्‍यात आले आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2013 मध्ये बलात्काराच्या विरोधात 450 खटले दाखल झाले होते. लैंगिक शोषणप्रकरणी 2013 मध्ये 1000 खटले दाखल करण्यात आले होते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, काय सांगतो, 'नॅशनल क्राइम ब्यूरो'चा अहवाल...