आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे आव्हान मोडण्यासाठी तयार करतोय 6 पाणबुड्या; नौदलप्रमुखांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हिंद महासागर व चीनचे आव्हानास तोंड देण्यासाठी भारत आपल्या नौदलास अत्याधुनिक स्वरूप देत आहे. यानुसार आणखी ६  अण्वस्त्र पाणबुड्या बांधण्यात येत आहेत. नौदल प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले, आम्ही ६ अण्वस्त्र पाणबुड्या तयार करत आहोत. याची यापेक्षा जास्त माहिती आम्ही देऊ शकत नाही. हे काम नौदलाकडे असलेल्या पाणबुड्यांच्या ताफ्याच्या सुवर्ण जयंतीदरम्यान सुरू करण्यात आले. 


३४ जहाजांची निर्मिती

नौदलासाठी विविध श्रेणीतील ३४ जहाजांची बांधणी करण्यात येत आहे. ही जहाजे भारतीय शिपयार्डात बांधली जात आहेत. स्वदेशी विमानवाहक जहाजांचे काम वेगाने सुरू आहे. ते २०२० पर्यंत नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होईल.

 

अमेरिकी अधिकाऱ्यांना परवानगी नाही
अॅडमिरल लांबा म्हणाले, रशियाकडून भाडेतत्त्वावर घेतलेली अण्वस्त्र पाणबुडी आयएनएस चक्रच्या सोनार डोमची काही हानी झाली आहे. मात्र, येथे अमेरिकी अधिकाऱ्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. रशिया व भारतीय अधिकाऱ्यांनी क्षतिग्रस्त भागाची पाहणी करून आढावा घेतला.

 

नव्या पाणबुड्या विकसित करतोय चीन
 चीनने अण्वस्त्र क्षमता असलेल्या नव्या पाणबुड्या विकसित केल्या आहेत. आठ हजार किमी अंतरावरून मारा करणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे येथे बसवली जाऊ शकतील. तज्ज्ञांनी सांगितले, या श्रेणीच्या पाणबुड्यामध्ये १२ क्षेपणास्त्रे तैनात केली जाऊ शकतात. तैवान येथे चायनीज कौन्सिल फॉर अॅडव्हॉन्स पॉलिसी स्टडीजचे अँड्यू यांग यांनी सांगितले, यात एका पाणबुडीचे परीक्षण केले जात आहे. आणखी पाच पाणबुड्यांची योजना आहे. 

बातम्या आणखी आहेत...