आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Thousands Security Men Are Keeping Strict Vigil At Rashtrapati Bhavan

नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची अभूतपूर्व व्यवस्था; सहा हजारांहून अधिक सुरक्षारक्षक तैनात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाचे 15वे पंतप्रधान म्हणून भाजपचे नेते नरेंद्र मोदी आज (सोमवार) सायंकाळी राष्ट्रपती भवनात शपथ ग्रहण करणार आहे. शपथविधी सोहळ्याला सार्क देशाच्या प्रतिनिधींसह जवळपास चार हजार लोकांना आमंत्रित करण्‍यात आले आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची अभूतपूर्व व्यवस्था करण्‍यात आली आहे. दिल्लीत ठिकठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

सुरक्षा व्यवस्थेसाठी दिल्ली पोलिस, रॅपीड अॅक्शन फोर्स, पॅरामिलिट्री फोर्ससह विविध राज्यातील राखीव पोलिस दलाच्या जवानांची मदत घेण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांसह वायु दल आणि भूदलाचे अधिकारी एकमेंकांमध्ये उत्तम समन्वय ठेवताना दिसत आहे. नवी दिल्ली जिल्हा पोलिसांनी मंगळवारपर्यंत (दि.27) मनाई हुकूम लागू केला आहे. संपूर्ण परिसरात 'नो फ्लाइंग झोन'मध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे. याबाबत संबंधित एजेंसीज् ला सूचनाही देण्यात आल्या आहेत.
संयुक्त पोलिस आयुक्त एमके मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणतंत्र दिवस सोहळ्याच्या सुरक्षेसारखी व्यापक स्तरावर सुरक्षा नीती वापरण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्याच्या स्थळापासून संपूर्ण जिल्ह्यात मनाई हुकूम लागू करण्यात आला आहे. सर्वप्रकारची उड्डानांवर निर्बंध घालण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्यातच्या ठिकाणाहून गॅसची फुगे हवेत सोडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

दहशवाद्यांच्या हलचालीवर दिल्ली पोलिस बारीक लक्ष ठेवून आहेत. भारतीय वायुसेनेने एक हवाई रक्षा प्रणाली तयार केली आहे. विमानांना निशाणा बनवण्यासाठी अँटी एअरक्राफ्ट गनला उंच इमारतीवर तैनात करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवन परिसरात स्नीफर डॉग आणि बॉम्बशोधक पथक तैनात करण्‍यात आले आहे. ठिकठिकाणी क्विक रिएक्शन टीम, मोबाइल हिट टीमला तैनात केले आहे. दिल्ली पोलिसांना अनेकदा सुरक्षेचा सरावही करून घेतला आहे.
राष्ट्रपती भवनाजवळ नार्थ ब्लॉक, साउथ ब्लाकमधील सर्व इमरतीची झाडाझडती घेण्यात आली आहे. तसेच दुपारी एक वाजेनंतर सील करण्यात येणार आहे. सायंकाळी चारवाजेपासून या परिसरात सगळ्या वाहनांना प्रवेश निषेध करण्‍यात आला आहे. प्रतिबंधित भागात तसेच मार्गावर फक्त पासधारकांना प्रवेश दिला जाणार आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, भाजप आज दिल्लीत साजरी करणार दिवाळी...