आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 टक्के पुरुष वापरतात डिओड्रंट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2004 मध्ये इमामी कंपनीने देशात केवळ पुरुषांसाठीची फेयरनेस क्रीम बाजारात आणली होती. दहा वर्षांनंतर भारतीय पुरुषांनी विशेषत: तरुणांनी या उत्पादनांमध्ये एवढी रुची दाखवली की कंपन्याही चकित झाल्या आहेत. डिओड्रंट विक्रीची आकडेवारी सर्वात जास्त आश्चर्यचकित करणारी आहे. हे उत्पादन 60 टक्के पुरुषांनी खरेदी केले, महिलांचे हे प्रमाण 40 टक्के आहे.

सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्याच्या प्रकरणांत पुरुषांनी महिलांशी बरोबरी साधली आहे. या बाजारपेठेचे सर्वेक्षण केलेले अ‍ॅसोचॅमचे सरचिटणीस डी. एस. रावत म्हणाले, तरुणांची जीवनशैलीबाबतची जागरूकता, वाढती कमाई, ब्रँडची माहिती, मीडियातून होणारी जाहिरात, प्रोडक्ट रेंजमुळे त्यांच्यातील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ अचानक वाढली आहे. लहान शहरांतील पुरुषांमध्ये फेयरनेस क्रीमसारख्या उत्पादनाबाबत जास्त आकर्षण आहे.

डिओ सेल्स
जगात एक तृतीयांश पुरुष डिओ खरेदी करतात, आपल्या देशात हे प्रमाण 60 टक्के आहे.
- अमेरिकेमध्ये 68 महिला आणि 32 % पुरुषांचे प्रमाण आहे. आशियामध्ये डिओची 83 टक्के खरेदी महिला तर 17 % पुरुष करतात.
- देशात डिओड्रंटची पाच वर्षांत पाच पट वाढ झाली. कॉस्मोटिक्समध्ये सर्वाधिक वेग. संपूर्ण एफएमसीजी क्षेत्राची वाढ 9.4 % राहिली.
- 2007 मध्ये डिओचा देशातील व्यवसाय 280 कोटी रुपये होता. आता जवळपास 2300 कोटी रुपये झाला आहे.

वापर वाढण्याचे कारण
18-30 वर्षे(सर्वात मोठा वर्ग) - गोरेपणा व दुसर्‍यापेक्षा चांगले दिसणाची इच्छा.
- 45 वर्षांपेक्षा जास्त(उभरता वर्ग)- व्यावसायिक जीवनात तरुण दिसण्याची इच्छा.
- महिलांच्या तुलनेत पुरुष ब्यूटी प्रोडक्टवर खर्च करत आहेत.
- 85 % पुरुष स्वत: ही उत्पादने खरेदी करतात.
- अ‍ॅसोचॅमचे सर्वेक्षण

सर्वाधिक पसंती
फेयरनेस क्रीम, टॉल्कम पावडर, हेअर कलर, अँटी सर्कल क्रीम, अँटी रिंकल प्रोडक्ट्स, हेअर स्टायलिंग जेल, फेसवॉश, फेसपॅक, सनस्क्रीम, शॅम्पू, कंडीशनर यासारख्या उत्पादनांची विक्री पुरुषांमध्ये लोकप्रिय आहे.

फ्युचर ट्रेंड
ग्लोबल रिसर्च फर्म मेकक्वरीच्या म्हणण्यानुसार काही वर्षांपूर्वी बाथ सोपच्या जागी शॉवर जेल किंवा लिक्विड सोपचा वापर अचानक वाढला.