आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 रेल्वे गाडया रद्द, 16 गाड्यांचे मार्ग बदलले; वाढते अपघात रोखण्यासाठी उचलले पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वेच्या 60 गाड्या रद्द करण्यात आल्या असून 16 गाड्य़ांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त 4 गाड्यांचा अंतिम थांबा बदलण्यात आला आहे. (सांकेतिक फोटो) - Divya Marathi
रेल्वेच्या 60 गाड्या रद्द करण्यात आल्या असून 16 गाड्य़ांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त 4 गाड्यांचा अंतिम थांबा बदलण्यात आला आहे. (सांकेतिक फोटो)
नवी दिल्ली- रेल्वेचे वाढते अपघात रोखण्यासाठी आता ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. रेल्वेच्या सुरक्षेविषयक बाबींकडे लक्ष देण्यासाठी 60 गाड्या रद्द करण्यात आल्या असून 16 गाड्य़ांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त 4 गाड्यांचा अंतिम थांबा बदलण्यात आला आहे. 11, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती 139 या क्रमांकावर मिळु शकणार आहे. enquiry.indianrail.gov.in याठिकाणीही माहिती उपलब्ध असणार आहे.
 
या गाडया करण्यात आल्यात रद्द
- ज्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यात श्रमजीवी, वैशाली, गोमती, पूर्वा, जनशताब्‍दी, इंटरसि‍टी, स्‍वत्रंता सेनानी, नंदन कानन आणि एसी स्‍पेशल समवेत अनेक एक्स्प्रेस आणि मेल गाडयांचा समावेश आहे. या गाड्या 11, 12 आणि 13, 14 सप्टेंबर रोजी धावणार होत्या.
- डेहराडून-नवी दि‍ल्‍ली शताब्‍दी, नवी दि‍ल्‍ली सि‍यालदाह दूरंतो, गया-नवी दि‍ल्‍ली महाबोधी, दि‍ल्‍ली-सहारानपूर या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...