नवी दिल्ली - टॅक्स, सिक्युरिटी आणि पाल्यांचे शिक्षण यासह इतर काही कारणाने मागील 14 वर्षांत भारतातील तब्बल 61 हजारपेक्षा अधिक कोट्यधीशांनी देश सोडून दुस-या देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. न्यू वर्ल्ड हेल्थ आणि एलआयओ ग्लोबल नावाच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसातून ही बाब समोर आली आहे.
ब्रिटनमधील 1.25 लाख कोट्यधीश दुस-यात देशात
जगातील अतीश्रीमंत लोकांवर संशोधन करत असलेल्या न्यू वर्ल्ड हेल्थ और एलआआओ ग्लोबल या संस्थेच्या अहवालानुसार, 21 व्या शतकात नागरिकत्व बदललणे आणि दुहेरी नागरिकत्व घेणे हे प्रकार अधिक होत आहेत. सन 2000 ते 2014 मध्ये 61 हजार कोट्यधीश भारतीयांनी भारताचे नागरिकत्व सोडले. चीनमध्ये हा आंकडा 91 हजार आहे. दरम्यान, ब्रिटनमधील सर्वांत जास्त म्हणजेच 1.25 लाख कोट्यधीशांनी दुस-या देशात जाऊन आपले बस्ताण मांडले.
भारत सोडून कुठे राहणे आवडते
अहवालानुसार, संयुक्त अरब अमीरात, ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेण्याकडे भारतीय कोट्यधीशांचा अधिक कल आहे. चीनमधील कोट्यधीशांना अमेरिका, हांगकांग, सिंगापूर आणि ब्रिटनमध्ये राहणे आवडते. मागील 14 वर्षांत चीन आणि भारतानंतर फ्रांसचे 42,000, इटलीचे 23,000, रशियाचे 20,000, इंडोनेशियाचे 12,000, साउथ अफ्रिकेचे 8,000 आणि मिस्रचे 7,000 कोट्यधीश दुस-या देशात स्थायिक झालेत.