आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - देशातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणा-या अनेक मोठ्या प्रकल्पांतील जलसाठ्यांची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. जलसंसाधनमंत्री हरीश रावत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून केंद्र सरकारची देखरेख असणा-या 84 पैकी 63 मोठ्या प्रकल्पांतील पाणीपातळी घटली आहे.
‘दिव्य मराठी नेटवर्क’ने 25 डिसेंबरच्या अंकात याबाबत एक वृत्तविशेष प्रकाशित केले होते. त्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना रावत यांनी वरील माहिती दिली. या मोठ्या प्रकल्पांच्या पाणीपातळीत घट होण्याचे मुख्य कारण नदीच्या खो-यात कमी झालेले पावसाचे प्रमाण आणि हिमनद्यांचे वितळणे कमी होणे हे आहे. ज्या धरणांमधील पाणीपातळी घटली आहे त्यात पंजाबमधील भाक्रा नांगल प्रकल्पाची समावेश आहे. भाक्रा नांगल हा देशातील मोठ्या धरण व जलाशयांपैकी एक आहे. याशिवाय पंजाबमधील पोंग नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचीही स्थिती अशीच आहे. मध्य व दक्षिण भारतातील अनेक प्रकल्पांच्या पाणीपातळीत सातत्याने घट होत आहे. पर्यावरणतज्ज्ञ आलोक धीमरी यांच्या म्हणण्यानुसार बड्या प्रकल्पांमधील पाणीपातळी घटल्याने शेकडो गावांतील कोट्यवधी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईला सामोरे जावे लागू शकते.
असे घटले पाणी
हिमालयातून निघणा-या अनेक नद्यांमध्ये बर्फ वितळल्याने पाणी येते. बर्फ न वितळल्याने नद्यांमध्ये कमी पाणी आले व पातळीत घट झाली. नद्यांवर बांधण्यात आलेल्या धरणांच्या पाण्याचा मुख्य उपयोग पिण्यासाठी केला जातो. पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठीही करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रकल्पांतील पाणीपातळी घटली आहे. धरणे रुंद न करणे तसेच प्रकल्पांत साठलेले माती - दगड, गाळ न काढणे, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस होणे.
सरकारने उचललेली पावले : जलाशयांमध्ये पाणीसाठा वाढावा यासाठी जलव्यवस्थापन व संरक्षणाच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. धरणांमधील पाणी वितरणात पेयजलाला प्राधान्य देणे. त्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून भूजलाचा जपून वापर करण्यास सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.