आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 पैकी आठ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा झेंडा, \'कासव\'ला मिळाले सुवर्णकमळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कासव चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाले आहे. अद्याप हा चित्रपट प्रदर्शित व्हायचा आहे. - Divya Marathi
कासव चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाले आहे. अद्याप हा चित्रपट प्रदर्शित व्हायचा आहे.
६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी अापला झेंडा फडकावला. ‘कासव’, ‘दशक्रिया’, ‘व्हेंटिलेटर’, ‘सायकल’ यासारख्या रसिकप्रिय चित्रपटांनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले.  ‘आबा ऐकताय ना ?’ या लघुपटानेही अव्यावसायिक गटात यशाचा तुरा खाेवला. या चित्रपटांशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती, कलाकार व दिग्दर्शकांनी या सुवर्ण यशाबाबत ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दात...
 
नवी दिल्ली - शुक्रवारी जाहीर झालेल्या ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठी चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळाला. या पुरस्कारांच्या एकूण १४ श्रेणींपैकी सात श्रेणींतील पुरस्कारांवर मराठी झेंडा फडकला आहे. ‘कासव’ या मराठी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्काराची शर्यत जिंकत अव्वल चित्रपटासाठीचे सुवर्णकमळ पटकावले. 

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी ‘कासव’ हा चित्रपट दिग्दर्शित केला असून अद्याप तो प्रदर्शित झालेला नाही. याशिवाय ‘दशक्रिया’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे.  राजेश मापुस्कर यांना ‘व्हेंटिलेटर’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, तर याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलन व्हिडीओ” रेकॉर्डिंग, ध्वनी मिश्रणासाठीच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते  ३ मे रोजी नवी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होईल.
 
बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमारला ‘रूस्तम’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अक्षयचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. १९५९ च्या नानावटी प्रकरणावर बेतलेल्या ‘रूस्तम’मध्ये अक्षय कुमारने एका देशभक्त नौदल सैनिकाची भूमिका केली आहे. चित्रपट निर्माते प्रियदर्शन यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरीने अमिताभ बच्चनची भूमिका असलेल्या ‘पिंक’ या चित्रपटाची  सामाजिक प्रश्नावर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड केली आहे.
 
सुरभी सी. एम. यांची ‘मिन्नामिनुन्गू- द फायरफ्लाय’ या मल्याळी चित्रपटातील भूमिकेसाठी या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. अभिनेत्री सोनम कपूरची भूमिका असलेल्या ‘नीरजा’ चित्रपटाने हिंदी चित्रपटांच्या श्रेणीत अव्वल स्थान पटकावले. हा चित्रपट हवाई सुंदरी नीरजा भनोटच्या जीवनावर आधारित आहे. विमानाचे अपहरण झाल्यानंतर जिवाची पर्वा न करता प्रवाश्यांचे प्राण वाचवणाऱ्या नीरजाला अतिरेक्यांनी ठार केले होते. सोनम कपूरच्या उत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत समीक्षकांनी विशेष उल्लेख केला आहे. ‘ धनक’ हा सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट ठरला. ‘साथमनाम भक्ती’ हा तेलगू चित्रपट सर्वोत लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. आमिर खानची भूमिका असलेल्या ‘दंगल’ चित्रपटातील भूमिकेसाठी काश्मिरी अभिनेत्री झायरा वसीमची सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

आतापर्यंत सर्वाधिक पुरस्कार बंगाली भाषेला : राष्ट्रीय पुरस्काराची सुरूवात १९५३ मध्ये झाली त्यावेळी  पहिलाच पुरस्कार शामची आई या मराठी चित्रपटाने पटकावला होता. त्यानंतरच्या काळात बंगाली भाषिकांचे या पुरस्कारावर वर्चस्व राहिले. बंगाली भाषिक चित्रपटांना आतापर्यंत 
२२ पुरस्कार मिळाले असून ते अव्वल स्थानी आहेत.  तर हिंदी  भाषिक चित्रपट १३ पुरस्कारासह दुसऱ्या क्रमांकावर, मल्याळम ११, कन्नड ६ आणि मराठी चित्रपट ५ पुरस्कारासह अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत. 
 
कासव विजयी
मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याची ही पाचवी वेळ आहे. यापूर्वी श्यामची आई चित्रपटाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार १९५३ मध्ये मिळाला होता. त्यानंतर ५० वर्षांनी ‘श्वास’ ला २००३ मध्ये पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २०११ मध्ये गिरीश कुलकर्णी यांच्या ‘देऊळ’ला, तर २०१४ मध्ये कोर्ट चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.  आता २०१७ मध्ये ‘कासव’ने बाजी मारली.
 
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१७
- सर्वोत्कृष्ट चित्रपट : कासव
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता : अक्षय कुमार (रुस्तम)
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता  : मनोज जोशी (दशक्रिया)
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : झायरा वासिम (दंगल)
- आधारित पटकथा : दशक्रिया
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा : सायकल
- सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साउंड मिक्सिंग : व्हेंटिलेटर
- सर्वोत्कृष्ट संकलन : व्हेंटिलेटर
- स्पेशल इफेक्ट्स : शिवाय
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : नीरजा
- मराठी चित्रपट : दशक्रिया
- स्पेशल मेन्शन : सोनम कपूर (नीरजा)
 
पुढील स्लाईडद्वारे वाचा, सुवर्ण यशाबाबत ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दात...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...