आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 67th Republic Day Parade 2016 Live From Rajpath 26 January

R\'DAY : 232 वर्षांनंतर फॉरेन आर्मीचा सहभाग, राजपथावर विविधेतील एकतेचे दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशभरात 67 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्‍यात येत आहे. देशाची राजधानी दिल्लीत राजपथावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्‍यात आले. नंतर राष्ट्रगीत झाले. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. कार्यक्रमासाठी अभूतपूर्व सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लाइव्ह अपडेट्स...
11:36 AM : सुखोई-30 ने ताशी 900 किलोमीटरच्या वेगात हवाई करतब दाखवली. फ्लॅकरच्या संचालनासोबतच राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रमा मोठ्या दिमाखात पार पडला.
11:31 AM : सी 17 ग्लोबमास्टरने ताशी 500 किलोमीटर वेगात दाखवली करतब. दोन सुखोई देखील फ्लाय पास्टमध्ये सहभागी
11:30 AM : हर्क्यूलिस फॉर्मेशनमध्ये ताशी 300 किलोमीटर वेगात सी-130 जे सुपर हरक्यूलिस हेलिकॉप्टरने दाखवली करतब
11:23 AM : मोटरसायकल स्वार जांबाजने दाखवली करतब. टीमच्या नावावर 4 लिम्का बुक अवॉर्डची नोंद
11:19 AM : आर्मी पब्लिक स्कूल सदर बाजार दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी दिली सलामी 'गंगा' प्रदूषित करू नका, असा दिला संदेश
11:17 AM : साउथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर नागपूरचे विद्यार्थी राजपथवर. दाखवली महाराष्ट्रातील लोककला
11:14 AM : सर्वोदय कन्या विद्यालयाचे विद्यार्थी राजपथावर. ओडिशातील फोक डान्स करून जिंकले प्रेक्षकांची मने
11:12 AM : सर्वात आधी भारती पब्लिक स्कूलचे संचालन
11:10 AM : शौर्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे संचालन, यंदा दोन विद्यार्थ्यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार
11:09 AM : पंचायती राज्य मंत्रालयाचे संचालन. थीम- 'सशक्त महिला सशक्त पंचायत'
11:08 AM : केंद्रीय निवडणूक आयोगाचे संचालन. निवडणूक आयोग यंदा पहिल्यांदा राजपथावरील परेडमध्ये सहभागी झाले आहे.
11:07 AM : कम्युनिकेशन अॅण्ड आयटी मिनिस्ट्रीचे संचालन. थीम- 'डिजिटल इंडिया'
11:06 AM : मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वॉटर अॅण्ड सेनिटेशनचे संचालन. थीम- 'स्वच्छ भारत अभियान'
11:05 AM : न्यू अॅण्ड रिन्यूएब मिनिस्ट्रीचे संचालन
11:04 AM : सोशल जस्टिस अॅण्ड एम्पावर्मेंट मिनिस्ट्रीचे संचालन
11:02 AM : आसाम राज्यातून आलेल्या महिला कलाकारांनी रांगोळीतून राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडवले. पारंपरिक नृत्यही सादर केले.
11:01 AM : उत्तर प्रदेशातून आलेल्या कलाकारांनी जरदोजी कढाई कलेचे दर्शन घडवले. जरदोजी सर्वात पुरातन व महागडी कढाई शैलीपैकी एक आहे.
11:00 AM : उत्तराखंडातून आलेल्या कलाकरांनी रम्माण उत्सव दाखवला. एप्रिलमध्ये उत्सव साजरा करण्‍यात येतो.
10:59 AM : तमिळनाडूतून आलेल्या कलाकारांनी ठोडा जमातीच्या दर्शन घडवले.
10:59 AM : छत्तीसगडमधील खैरागड आर्ट अॅण्‍ड म्युझिक यूनिव्हर्सिटीचे संचालन केले. जगातील ही सर्वात पुरातन यूनिव्हर्सिटी आहे.
10:57 AM : मध्य प्रदेशातील संचालनात पांढर्‍या वाघाचे सगळ्यांना दर्शन घडवले. जंगली प्राण्याचे संरक्षण करा, असा संदेश यातून देण्यात आला.
10:56 AM : कर्नाटकाच्या संचालनात कोडगू दाखवण्यात आला. कोडगूला कर्नाटकतील 'कॉफी लॅंड' समजले जाते.
10:55 AM : बिहाराच्या संचालनात चंपारण सत्याग्रहाचे दर्शन घडवण्यात आले.
10:54 AM : पश्चिम बंगालमधील कलाकारांनी बंगालमधील बाउल अर्थात चारण समाजाची झलक दाखवली.
10:53 AM : ओडिशातील कलाकारांनी बोईत बंदाणचे दर्शन घडवले.
10:51 AM : त्रिपुराच्या कलाकारांनी लोककला सादर केली.
10:50 AM : चंडीगडचे संचालन 'खुला स्वागत, खुली प्रदानता'
10:49 AM : राजस्थानच्या कलाकारांनी संचालनात हवामहलचे दर्शन घडवले. जयपूरचे महाराजा सवाई प्रताप सिंह यांनी 1799 मध्ये हवामहल उभारला होता .
10:48 AM : जम्मू काश्मीरने 'मेरा गांव मेरा देश' या थीमवर संस्कृती दर्शन घडवले
10:47 AM : सिक्किमच्या कलाकारांनी 'सागा दावा' या थीमवर सिक्किममधील बुद्ध जयंती उत्सव सादर केला
10:46 AM : गुजरातच्या कलाकारानी 'गिर का शेर' या थीमवर जंगली प्राण्यांचे दर्शन घडवले.
10:44 AM : एनएसएसचा मार्चिंग कंटीजेंटने दिली सलामी
10:43 AM : ज्वाइंट पाइप बॅँडने दिली सलामी
10:43 AM : एनसीसी सीनियर डिव्हिजनच्या फिमेल कँडिडेट्‍सनी दिली सलामी
10:42 AM : एनसीसी गर्ल्स बॅंडने ‍दिली सलामी
10:40 AM : दिल्ली पोलिस मार्चिंग बॅंडने दिली सलामी. बलराम यादव यांनी केले नेतृत्त्व
10:38 AM : आरपीएफच्या जवानांनी दिली सलामी
10:37 AM : सीआरपीएफच्या जवानांनी दिली सलामी
10:36AM : कोस्टगार्डच्या जवानांनी दिली सलामी
10:34AM : सलामी देताना बीएसएफचा मार्चिंग बॅंड. उंटावर स्वार होऊन दिली सलामी
10:33AM : बीएसएफची तुकडी राजपथवर. डेप्युटी कमांडेंट अरविंद गिरी यांनी केले नेतृत्त्व
10:32AM : एंटी सबमरीन वारफेयर टॉरपीडो माहरीषने दिली सलामी
10:31AM : डीआरडीओने दिली सलामी
10:30AM : एयरफोर्सने दिली सलामी
10:29AM : एयरफोर्सच्या बँडने दिली सलामी
10:29AM : एयरफोर्सच्या मार्चिंग पथकाने दिली सलामी
10:28AM : इंडियन नेव्हीने दिली सलामी
10:25 AM : नेव्हल ब्रास बॅंडने दिली सलामी
10:25 AM :रेमाउंट वेटेरनरी कोरच्या डॉग स्क्वॉड पथकाने दिली सलामी. 26 वर्षांनंतर राजपथवर
10:24 AM : 11 गोरखा राइफल्सचे जवानांनी दिली सलामी
10:20 AM : कोर ऑफ सिग्नल्सच्या दस्त्याने दिली सलामी. अनेक वर्षांनंतर परेडमध्ये झाले सहभागी
10:19 AM :पॅराशूट रेजिमेंटने दिली सलामी
10:17 AM : इंटीग्रेटेड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक डिफेंस सिस्टमने दिली सलामी. कॅप्टन अर्चना सिंहने केले नेतृत्त्व
10:15 AM : स्मर्च लॉन्चर व्हीकल्सने दिली सलामी
10:15 AM : आकाश मिसाइलने दिली सलामी. कॅप्टन नेहा सिंहने केले नेतृत्त्व
10:13 AM : टॅंक टी-90 भीष्मने दिली सलामी
10:11 AM : 1950 नंतर पहिल्यांदा फ्रांस आर्मीची तुकडी राजपथवर. तुकडी महिला जवानही झाल्या सहभागी
10:10 AM : परमवीर चक्र विजेता सूबेदार योगेंद्र यादव, कॅप्टन बाना यांनी दिली सलामी
10:09 AM : परेड सुरु
10:03 AM : लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी यांची पत्नी भावना गोस्वामी यांनी स्विकारले अशोक चक्र
10:03 AM : लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी यांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. गोळ्या लागल्यानंतर देखील त्यांनी आपल्या साथीदार्‍यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले होते.
10:00 AM : लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी यांनी सप्टेंबर 2015 मध्ये कुपवाडा येथील चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.
10:00 AM : राजपथावर राष्ट्रपती प्रणव मुखजींनी फडकवला तिरंगा
9:58 AM : राजपथावर पोहोचले फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद, तिन्ही दलाच्या प्रमुखांची घेतली भेट
9:58 AM : राजपथावर पोहोचले ओलांद, नरेंद्र मोदींनी केले स्वागत
9:42 AM : राजपथावर पोहोचले नरेंद्र मोदी
9:41 AM : अमर जवान ज्योतिवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहीदांनी दिली श्रद्धांजली
9:40 AM : अमर जवान ज्योतिवर पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी
9:39 AM : राष्ट्रपती भवनकडून राजपथाकडे रवाना झाले फ्रांस्वा ओलांद व राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी
9:35 AM : राष्ट्रपती भवनाना ओलांद यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला.
9:35 AM : अमर जवान ज्योतिवर पोहोचले संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर
9:34 AM : अमर जवान ज्योतिवर पोहोचले राव इंद्रजीत सिंह.
09:12 AM : राजनाथ सिंहने आपल्या घरावर फडकवला तिरंगा
09:05 AM : शिवराज सिंह चौहान यांनी रतलाममध्ये केले ध्वजारोहण
08:29 AM : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
08:20 AM : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅलकम टर्नबुल यांनी भारतीयांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
08:15 AM : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात केले ध्वजारोहण
08:07 AM : भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपच्या मुख्यालयात फडकवला तिरंग
08:00 AM: दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा. सकाळी 09:25 पासून सुरु होईल रिपब्लिक डे सेलिब्रेशन

राजपथाला छावणीचे स्वरुप...
राजपथाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. ड्रोन हल्ल्यांचा धोका पाहता दिल्लीलगतच्या राज्यांवरही नजर ठेवली जात आहे. दरम्यान, पठाणकोट हवाईतळावर झालेला हल्ला आणि त्यानंतर इसिस आणि अल-कायदासारख्या संघटनांचे नेटवर्क उधळून लावण्यासाठी सुरक्षा संस्थांनी चालविलेल्या धाडसत्राच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पॅरिसमध्ये गेल्या नोव्हेंबरमध्ये ISIS ने दहशतवादी हल्ला केला होता. ओलांद हे ISIS च्या हिट लिस्टवर आहेत. दुसरीकडे फ्रेंच आर्मीच्या रुपात पहिल्यांदा विदेशी फौज परेडमध्ये सहभागी होणार आहे. देशभरात अनेक संशयितांना अटक करण्‍यात आली आहे. सर्व संशयित प्रजासत्ताक दिनी देशात मोठा घातपात करण्‍याच्या फिराक मध्ये होते.

पठाणकोटमध्ये चोख सुरक्षा बंदोबस्त
पठाणकोटमध्ये चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि सर्वच शासकीय इमारतींच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. प्रजासत्ताकाचा मुख्य कार्यक्रम असलेल्या काश्मीरच्या श्रीनगरमधील बक्षी स्टेडियमवर पोलिसांनी शक्तिप्रदर्शन करीत कडक बंदोबस्त ठेवला आहे.

परेडमध्ये यंदा काय असेल खास...
1. पहिल्यांदा फ्रेंच आर्मी

- 1950 पासून राजपथावर परेड होत आहे. मात्र, 66 वर्षात देशाच्या इतिहासात पहिल्यांदा राजपथावर होणार्‍या परेडमध्ये फॉरेन आर्मी सहभाग घेत आहे.
- फ्रांसचे अध्यक्ष ओलांद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत फ्रेंच आर्मीच्या 35th इन्फ्रेंट्री रेजीमेंटचे 130 जवान परेडमध्ये सहभाग घेतील. त्यांचे बॅंड पथक देखील सहभागी होईल.
- यापूर्वी, फ्रान्सने 2009 मध्ये भारताला सन्मानित करत आपल्या परेडमध्ये इंडियन आर्मीच्या मराठा लाइट इन्फ्रेंट्रीला संधी दिली होती. यंदा भारताने फ्रांसला राजपथावरील परेडमध्ये सहभागी होण्याची संधी दिली आहे.

2. पहिल्यांदा डॉग स्क्वॉड
- आर्मीचा डॉग स्क्वॉड पहिल्यांदा परेड सहभागी होणार आहे. स्क्वॉडमध्ये 1200 डॉग्ज आहेत. यात लेब्राडोर, बेल्जियन शेफर्ड्स, जर्मन शेफर्ड्स जातीच्या डॉग्जचा समावेश आहे.
- डॉग्जला एक्स्पलोसिव्स, नारकोटिक्स, माइन्स डिटेक्ट करण्याची ट्रेनिंग दिली जाते.
- परेडसाठी 1200 पैकी 36 डॉग्जची निवड करण्‍यात आली आहे.

3. महिला डेअरडेव्हिल्स दाखवणार स्टंट
- यंदा पहिल्यांदा 120 महिला डेयरडेव्हिल्सची तुकडी परेडमध्ये सहभागी होणार आहे.
- यात सीआरपीएफ व आरएएफच्या तीन बटालियनची निवड करण्‍यात आली आहे.

4. बराक ओबामांपेक्षा ओलांद-मोदींना अभूतपूर्व सुरक्षा
- गत वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी 440 अधिकारी व 1600 अमेरिकन जवानांची फौज तैनात करण्‍यात आले होते.
- यंदा फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. ओलांद यांना ओबामांपेक्षा जास्त सुरक्षा भारताने उपलब्ध करून दिली आहे.
- ओलांद ISIS च्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या ‍सुरक्षेसाठी दिल्लीत 100 तुकड्या तैनात करण्‍यात आल्या आहेत.
- गेल्या वर्षी ओबामांसाठी 95 तुकड्या तैनात करण्‍यात आल्या होत्या.
- यंदा 50 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. राजपथ परिसरात 71 हाय राइज बिल्डिंग्ज बंद करण्‍यात आल्या आहेत.
- 400 पेक्षा जास्त बिल्डिंग्जवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

5. सीआरपीएफ व आयटीबीपीच्या अनेक तुकड्या दिसणार नाही...
- सीआरपीएफ, आयटीबीपी व सशस्त्र सीमा बलाच्या तुकड्या परेडमध्ये दिसणार नाही.
- परेडची वेळ कमी करण्‍यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

6. मोटोराइज्ड ग्लास रूफ
- गेल्या वर्षी यूएस अध्यक्ष बराक ओबामा चीफ गेस्ट होते. यंदा फान्सचे अध्यक्ष ओलांद आहे.
- पावसामुळे एसपीजीने ओबामा व मोदी यांना छत्र्या उपलब्ध करून दिल्या होत्या.
- यंदा मात्र, ओलांद व मोदी यांच्यासाठी मोटोराइज्ड ग्लास रूफ बनवण्यात आला आहे.
- फ्लाय पास्टवेळी ग्लास रूफ काढण्यात येणार आहे.

7. 90 मिनिटांत परेड संपणार...
- प्रतिवर्षी परेडचा कालावधी हा 115 मिनिटांचा असतो.
- यंदाची परेड मात्र 90 मिनिटांची असेल.
- यापूर्वी 2005 मध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम 145 मिनिटांवरून 115 मिनिटे करण्यात आला होता.

8. पहिल्यांदा इलेक्शन कमीशनची झांकी
- परेडमध्ये एकूण 23 झांकी आहेत. यात 16 राज्यांच्या तर 7 केंद्र सरकारच्या असतील.
- यंदा पहिल्यांदा इलेक्शन कमीशनची झांकी परेडमध्ये सहभागी होणार आहे.

26 जानेवारीला ओलांद यांचे कार्यक्रम...
- 26 जानेवारीला ओलांद सकाळी 9.30 वाजाता राष्‍ट्रपती भवनात पोहोचतील.
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जींसोबत ओलांद राजपथावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होती.
- दुपारी अडीच वाजता ते भारतात राहणार्‍या फ्रान्सच्या नागरिकांची भेट घेतील.
- सायंकाळी 5.20 वाजता ते पुन्हा प्रणव मुखर्जींची भेट घेतली व फ्रान्सला रवाना होती.
- यापूर्वी ओलांद ऑक्टोबर 2013 मध्ये भारत दौर्‍यावर आले होते. पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात फ्रान्सचा दौरा केला होता.
- मोदींनी यावेळी फ्रान्सकडून 36 राफेल वि‍मान खरेदी करण्‍याची घोषणा केली होती. याशिवाय न्यूक्लियर एनर्जी, स्पेस, रेल्वेसह विविध क्षेत्रात 19 करार करण्‍यात आले होते.
- सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, ओलांद यांच्यासोबत 100 सदस्यांची डेलिगेशन असेल. यात फ्रान्ससी कंपनी दसॉल्ट एव्हिएशन व डीसीएनएसचे अधिकारीही असतील.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...