आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 68% Of Milk Adulterated, Contains 'very Hazardous' Caustic Soda, White Paint: Government

भारतात ६८% दुधात धोकादायक भेसळ, लोकसभेत केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात तब्बल ६८% दूध खाद्य नियामकांच्या मानकांची पूर्तता करत नाही. दुधात अत्यंत धोकादायक आणि प्रकृतीसाठी अपायकारक असलेल्या डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, ग्लुकोज, पांढरे पेंट आणि रिफाइन्ड ऑइलसारख्या अखाद्य व धोकादायक पदार्थांची भेसळ असते. लोकसभेत सरकारच्या वतीने बुधवारी ही माहिती देण्यात आली.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले की, दुधातील भेसळ केवळ ४० सेकंदांत ओळखणारे तसेच भेसळीचा प्रकार सांगणारे स्कॅनर तयार करण्यात आले आहे. आधी प्रत्येक प्रकारची भेसळ ओळखण्यासाठी स्वतंत्र रासायनिक चाचणी करावी लागायची. अशी स्कॅनर्स खासदारांना अापल्या खासदार निधीतून खरेदी करता येतील, अशी सूचनाही त्यांनी केली. सध्या हे स्कॅनर महागडे असले तरी एका चाचणीसाठी अवघा १० पैसे इतकाच खर्च येतो.
भविष्यात दूधाच्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस तंत्रज्ञानाने नजर ठेवता येऊ शकते, असेही हर्षवर्धन यांनी सूचवले.
बातम्या आणखी आहेत...