आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 69th Independence Day Celebration Dvm News Live Updates

ANALYSIS : मोदींनी तोडले नेहरूंचे रेकॉर्ड; 86 मिनट 10 सेकंदाचे दीर्घ भाषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्‍वातंत्रदिनाच्‍या पर्वावर आज (शुक्रवार) लाल किल्‍ल्‍यावरून देशाला संबोधित केले. मोदींनी तब्‍बल 86 मिनट 10 सेकंद भाषण देत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे रेकॉर्ड तोडले. नेहरू यांनी 1947 मध्‍ये 72 मिनटापर्यंत स्पीच दिले होते.
मोदी यांनी केलेल्‍या चार मोठ्या घोषणा (गतवर्षी आणि या वर्षी)
- गत वर्षी मोदी यांनी आपल्‍या भाषणातून मेक इन इंडियावर जोर दिला होता. यंदा स्टार्ट अप इंडिया-स्‍टँड अप इंडियावर जोर दिला.
- गत वर्षी योजना आयोगचे नाव बदलणार असल्‍याचे सांगितले होते. यंदा कृषी मंत्रालयाचे नाव बदलून कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय करणार असल्‍याचे सांगितले.
- गत वर्षी त्‍यांनी संसद आदर्श ग्राम योजनेचा उल्‍लेख केला होता. त्‍यात 18500 गावांपर्यंत वीजपुरवठा पोहोचवण्‍याची घोषणा केली होती. त्‍यावेळी तिथे विजेचे खांबेही लावले गेले नव्‍हते. आता 1 हजार दिवसांत वीज देण्‍याचे आश्‍वासन दिले.
- गतवर्षी ते म्‍हणाले होते, 2019 पर्यंत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पूर्ण देश स्‍वच्‍छ होईल. आता म्‍हटले, संकल्‍प करा आणि 2022 पर्यंत दलित, आदिवासी, महिला आणि यांना प्रोत्‍साहन द्या

निवृत्‍त सैनिकांना आशा; पण वन रँक-वन पेंशनची घोषणा नाही
देशात 25 वर्षांपेक्षा अधिक सेवानिवृत्‍त सैनिक आहेत. पंतप्रधान आज वन रँक-वन पेंशन योजनेची घोषणा करतील, अशी त्‍यांना आशा होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी या बाबत ठोस घोषणा केली नाही. केवळ म्‍हटले, ‘तात्‍वता आम्‍ही वन रँक पेंशन योजना मंजूर केली आहे. ती अंमलात आणण्‍यासाठी चर्चा सुरू आहे. ही चर्चा अंतिम टप्‍प्‍यात आली आहे'', अशी माहिती त्‍यांनी दिली.
यावर्षी
गतवर्षी
लाल किल्‍ल्‍यावरून किती वेळ बोलले मोदी ?
मोदी 86 मिनट 10 सेकंद बोलले. पंडित नेहरू 1947 मध्‍ये 72 मिनट बोलले होते.
64 मिनट। नेहरू नंतर दुसरे सर्वात लांब भाषण
कसे बोलले?
वाचून बोलले नाहीत. पण, नोट्स काढलेल्‍या होत्‍या.
गतवर्षीही न वाचता केले होते भाषण
बुलेटप्रूफ कवर होते?
नाही. पण, राजीव गांधी नंतर दुसरे असे पीएम आहेत त्‍यांच्‍या जिवाला सार्वाधिक धोका आहे.
इंदिरा गांधीनंतर 29 वर्षांनी त्‍यांनी बुलेटप्रूफ काचाविना भाषण दिले.
काय परिधान केले होते?
क्रीम रंगाचा अंगरखा, पांढरा पायजामा, क्रीम कलरचे सिल्क-कॉटन मिक्स जॅकेट, जोधपुरी पटका
क्रीम कलरचा बंद गळ्यांचा मोदी अंगरखा , जोधपुरी पटका, चूड़ीदार पायजामा आणि सँडल.
लाल किल्‍ल्‍याच्‍या पाय-यापर्यंत कसे गेले ?
गार्ड ऑफ ऑनरनंतर पाय-या चढून तिरंगा पडकवण्‍यासाठी गेले.
लिफ्टचा वापर न करताना पाय-याने. यापूर्वी अनेक पीएमने लिफ्टचा वापर केला होता.
सुरक्षा तोडली?
नक्‍कीच. मुलांसोबत हात मिळवण्‍यासाठी गेले.
मुलांसोबत हात मिळवण्‍यासाठी गेले.
कोणत्‍या महापुरुषांचा उल्‍लेख केला?
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब अंबेडकर आणि महात्मा गांधी।
महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई, चंद्रशेखर आजाद, स्वामी विवेकानंद.
महिला सुरक्षेवर काय बोलले ?
2022 पर्यंत संकल्प करा की, महिलांना सशक्त बनावणार, बँकही स्टार्टअपमध्‍ये महिलांची मदत करणार
दुष्कर्म हा शरमेचा विषय आहे. नराधामांना कडक शिक्षा दिली गेली पाहिजे.
कोण योजनांची केली घोषणा
जन कल्याण, आदिवासियांसाठी असलेल्‍या योजनांवर फोकस. स्टार्ट अप इंडिया, स्टँडअप इंडिया, 1000 दिवसांत 18500 गांवांत वीज, कृषी मंत्रालय आता कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय होणार, 2022 पर्यंत दलित, आदिवासी, महिला, युवा सशक्तीकरणाचे संकल्प पूर्ण होणार.
जनधन योजना, संसद आदर्श ग्राम, मेक इन इंडिया, योजना आयोगाच्‍या जागी नीती आयोग, स्वच्छ भारत अभियान.
स्‍वत:बद्दल काय म्‍हटले
म्‍हटले- तुम्‍ही पाहिलेल्‍या स्‍वप्‍नांसाठी मी त्रास सहन करेन.
म्‍हटले, गरीब कुटुंबांतील सामान्‍य नागरिक आज येथे उभा आहे. मी प्रधानमंत्री नाही. प्रधान सेवक आहे.
पर्यावरणावर काय बोलले?
काही खास नाही
झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट.
पाकिस्तानवर काय बोलले?
उल्‍लेखच केला नाही.
गतवर्षीही काहीच बोलले नव्‍हते.
भ्रष्‍टाचा-याच्‍या मुद्दयावर कॉंग्रेसला कसे गुंडाळले ?

- सुषमा स्वराजवर असलेल्‍या आरोपावर
मोदी म्‍हणाले, ‘ ‘15 महिन्‍यांपूर्वी नागरिकांनी सरकार निवडले. श सरकारवर आतापर्यंत एका पैशाच्‍याही भ्रष्‍टाचाराचा आरोप झाला नाही. पण, काही लोक कायम निराशवादीच बोलत असतात. तसे बोलले नाही तर त्‍यांना झोप येत नाही. आम्‍हाला नागरिकांनी त्‍यांचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी येथे बसवले आहे. ते पूर्ण करण्‍यासाठी कुठलाही त्रास सहन करण्‍यास मी सक्षम आहे. ’’
- नागरिकांनी केलेल्‍या आरोपावर
मोदी म्‍हणाले, ''करप्शन हे वाळवीसारखे आहे. ते आपल्‍याला दिसत नाही. मात्र, ते आपल्‍या बेडरूममधील कपाटापर्यंत आले की त्‍याची जाणीव होते. काही लोक आजारी असतात. पण, नेमका आजार काय आहे हे कळू नये, असे त्‍यांना वाटते तर काही असेही असतात की, आजारपणालाच कवटाळून त्‍यावर तासन तास बोलत असतात. 125 कोटी नागरिकांनी त्‍यांच्‍यासाठी आपला वेळ वाया घालवू नये. मी केवळ बोललो नाही तर करून दाखवले. आमच्‍या पूर्वी सीबीआयने करप्शनचे केवळ 800 गुन्‍हे दाखल केले होते. आता आम्‍ही सत्‍तेत आल्‍यानंतर 1800 गुन्‍हे दाखल झाले आहेत.
- काळ्या पैशावर काहीच केले नाही या आरोपावर
मोदी म्‍हणाले, सत्‍तेत आल्‍यानंतर पहिल्‍या तीन आठवड्यात आम्‍ही खोळंबलेली कामे पूर्ण केलीत. आम्‍ही एसआयटी बनवली. अनेक देशासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्‍तापित केलेत ते यासाठीच की, त्‍यांच्‍याकडे कोणत्‍याही भारतीयाचे काळेधन असेल तर त्‍याची माहिती मिळावी. काळेधन परत आणण्‍याची पक्रिया विलंबाची आहे. ती सुरू आहे. पण, आता काळेधन देशाबाहेर जात नाही. अघोषित 6500 कोटी रुपये आणले गेले. यामुळे गरिबी कमी होण्‍यास मदत होईल.

- कोळसा घोटाळ्यावर
मोदी ने म्‍हणाले, कोळसा घोटाळ्यावर बोललो तर याला राजकाणाच्‍या पारड्यात तोलले जाईल. त्‍यामुळे विनंती करतो की, त्‍याला राजकाणाच्‍या पारड्यात तोलू नका. नियमबाह्य कोळसा खाणी दिल्‍याने 1.74 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आम्‍ही निवडणूक काळात यावर बोलत होते. त्‍यावेळी वाटत होते की, एवढे नुकसान झाले नसेल. आम्‍ही कोळसा, स्पेक्ट्रम यांचा लिलाव करण्‍याचे ठरवले होते. त्‍यात कोळशाचा लिलाव झाला आणि देशाच्‍या तिजोरीत 3 लाख कोटी रुपये जमा झालेत.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा नेमके काय म्‍हणाले मोदी