आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 कोटी लोक मद्य, ड्रग्जच्या आहारी, 2000-2001 दरम्यान पाहणीतील धक्कादायक माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात मद्य आणि अमली पदार्थांचे व्यसन असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा व्यसनाच्या आहारी गेलेल्यांची संख्या सुमारे ७.३२ कोटी असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. 
 
लोकसभेत सामाजिक न्याय मंत्री हंसराज अहिर यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सरकारकडील आकडेवारी सांगितली. २०००-२००१ दरम्यान करण्यात आलेल्या पाहणीतून हा आकडा समोर आला आहे. त्यापैकी ८७ लाख लोक भांग घेतात, २० लाख अफूचे सेवन करतात, तर सुमारे ६ कोटी २५ लाखांवर लोकांना मद्यपानाचे व्यसन आहे. गेल्या वर्षी अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने देशभरात टाकलेल्या छाप्यांत ४६ लाख ८७३ किलो ग्रॅमचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय ८ परदेशी नागरिकांनादेखील या प्रकरणात अटक झाली आहे, अशी माहितीही हंसराज अहिर यांनी दिली.

अवैध इंटरनेट संभाषणामुळे चिंतेत वाढ
दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या तपासात काही अांतरराष्ट्रीय अवैध फोन कॉल ट्रेस करण्यात आले आहेत, अशी माहिती हंसराज अहिर यांनी दिली. त्यामुळे सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. हे संभाषण इंटरनेटच्या माध्यमातून झाले. इनकमिंग कॉल परदेशातून आले होते. हे संभाषण नेमक्या कोणत्या ठिकाणाहून झाले, हे मात्र अहिर यांनी सांगितले नाही.

सतरा वर्षांपासून पाहणीच नाही
देशात २००० मध्ये राष्ट्रीय पातळीवर व्यसनासंबंधीची पाहणी झाली होती. त्यानंतर सतरा वर्षे उलटूनही अशी पाहणी झालेली नाही. त्यामुळे ताजी आकडेवारी मात्र सरकारच्या दप्तरी नाही.
बातम्या आणखी आहेत...