आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालन्यासह राज्यात ७ विकिरण केंद्रे होणार, भारत-रशिया करार; सोलापूर, नागपूरचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नाशवंत अन्नपदार्थ ताजे राहण्यासाठी तसेच त्यांचे कापणीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी भारत आणि रशियाने गुरुवारी २५ विकिरण केंद्रांना पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. यामध्ये महाराष्ट्रात सात केंद्रे स्थापन होणार आहेत. त्यातील पहिले शिर्डीजवळ वर्षभरात अस्तित्वात येत आहे. संबंधित केंद्रांमध्ये फुलांपासून माशांपर्यंतच्या वस्तूंवर प्रक्रिया केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील जालना, नागपूर, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, जेएनपीटी आणि पुण्यात केंद्र स्थापन होईल.
रशियाच्या रोसटोम अणुऊर्जा महामंडळाची उपकंपनी युनायटेड इनोव्हेशन कॉर्पोरेशन (यूआयसी) आणि हिंदुस्तान अॅग्रो कॉर्पाेरेशन यांच्यात ब्रिक्स व्यापार परिषदेदरम्यान हा करार झाला. कराराअंतर्गत देशभरात २५ केंद्रे स्थापन केली जातील. त्यात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात सात केंद्रे स्थापन होतील,असे हिंदुस्तान अॅग्रो कॉर्पोरेशनचे अध्यक्ष भारत ढोकानी पाटील यांनी सांगितले.
विकिरण केंद्रे स्थापन करण्यात यूआयसी तंत्रज्ञान भागीदार आहे. गुंतवणूक आणि योजनेच्या आर्थिक व्यवहार्यतेवर काम सुरू आहे. राज्यातील सात केंद्रांशिवाय अन्य राज्यांतील शहरे निश्चित झालेली नाहीत. गामा किंवा इलेक्ट्रॉन अॅस्सिलेटर सुविधेनुसार विकिरण केंद्रे डिझाइन केली जातील. आवश्यक प्राथमिक कामे आणि आर्थिक व्यवहार्यता तपासल्यानंतर केंद्राचा खर्च समजू शकेल. तांत्रिक बाजूचा विचार केल्यास केंद्रासाठी साधारण ४० लाख ते २ कोटी डॉलर खर्च येऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...