आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेनामी संपत्ती प्रकरणी आता 7 वर्षे कारावास, प्राप्तिकर विभागाची देशभरातील वृत्‍तपत्रात जाहिराती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बेनामी संपत्ती कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी सावधानतेचा इशारा दिला आहे. बेनामी संपत्ती संव्यवहार अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना सात वर्षे सश्रम कारावासाच्या शिक्षेबरोबरच सामान्य प्राप्तिकर अधिनियमांतर्गतही आरोपी बनवले जाऊ शकते, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. देशातील वृत्तपत्रांत दिलेल्या जाहिरातींत प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, बेनामी संव्यवहार करू नका. 
 
कारण बेनामी संव्यवहार प्रतिषेध अधिनियम- १९८८ ही १ नोव्हेंबर २०१६ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. काळा पैसा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे. त्याचे निर्मूलन करण्यासाठी सरकारला सहकार्य करा, असे  सर्व कर्तव्यदक्ष नागरिकांनी आमचे आवाहन आहे, असे त्या जाहिरातीत म्हटले आहे.
 
या जाहिरातींत कायद्याच्या काही महत्त्वपूर्ण कलमांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ज्या व्यक्ती बेनामी अधिनियमांतर्गत प्राधिकाऱ्यांसमक्ष खोटी माहिती प्रस्तुत करतील, हे अभियोज्य आहेत तथा त्यांना बेनामी संपत्तीच्या उचित बाजारभावाच्या १० टक्क्यांपर्यंत दंडाखेरीज अतिरिक्त पाच वर्षांपर्यंत कारावासही होऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...