आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-रशिया यांच्या 70 वर्षांच्या मैत्रीचा उत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत-रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधाला ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन, परिसंवाद इत्यादी कार्यक्रमांची त्यात रेलचेल पाहायला मिळणार आहे.  
 
१३ एप्रिलपासून हा समारंभ साजरा होणार आहे. रशियाच्या राजदूत कार्यालयातही त्याचे आयोजन होणार आहे. उभय देशांतील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून परस्परांना शुभेच्छा देण्याचा समारंभही होणार आहे. उभय देशांच्या संबंधावर प्रकाश टाकणारे लेख राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन व पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीच्या दैनिकांतून लिहिणार आहेत, अशी माहिती राजदूत सर्जेइ व्ही. कारमालिटो यांनी दिली.
 
गेल्या सात दशकांपासून दोन्ही देशांची विविध क्षेत्रांतील भागीदारी नेहमीच चांगली राहिली आहे. दोन्ही देशांच्या मैत्रीला दर्शवणारा विशेष लोगोदेखील तयार केला जाणार आहे. अशा विविध कार्यक्रमांची तयारी सुरू झाली आहे. दोन्ही देश नजीकच्या काळात संयुक्त चित्रपट, माहितीपट निर्मितीवर काम करणार आहेत.  
 
एकोणिसाव्या शतकापासून नाते : भारत-रशियाचे नाते एकोणिसाव्या शतकापासूनचे आहे. तत्कालीन बाँबेमध्ये रशियाचे तेव्हा वाणिज्यदूत होते. परंतु १९४७ मध्ये द्विपक्षीय आैपचारिक करार झाला. त्यानंतर भागीदारीची कागदोपत्री नोंद झाली, असे रशियाचे दिल्लीतील राजदूत अँटोली कार्गापोलोव्ह यांनी म्हटले आहे.  

लष्करी परिषदेकडे लक्ष  : भारत-रशिया यांच्यात मार्चच्या मध्यावर आैद्याेगिक पातळीवरील लष्करी परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ७० वर्षे पूर्तीच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांत लष्करासंबंधी कार्यक्रमाचाही समावेश करण्यात आला आहे. त्या माध्यमातून द्विपक्षीय संबंध बळकट केले जातील, असा विश्वास उच्चाधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.  

१३ एप्रिल १९४७ रोजी आरंभ  
भारत-रशिया यांच्यातील मैत्रीला १३ एप्रिल १९४७ रोजी आरंभ झाला होता. अर्थात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या चार महिने अगोदर ही मैत्री खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. रशियातील भारतीय राजदूत कार्यालयातदेखील समारंभ आयोजित केला जाणार आहे.  त्या अंतर्गत ‘नमस्ते रशिया’ नावाचा विशेष समारंभ आयोजित केला जाणार आहे.  
 
दिग्गज चित्रकारांचा समावेश  
प्रसिद्ध चित्रकार निकोलस रोइरिच यांच्यासह इतर अनेक दिग्गज चित्रकारांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन हे या समारंभाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...