आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे ७२ मंत्री कोट्यधीश!, २४ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे, १४ बारावीपेक्षाही कमी शिकलेले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदी सरकारमधील कोट्यधीश मंत्र्यांची संख्या ७२ वर तर गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या मंत्र्यांची संख्या २४ वर गेली आहे.
गेल्या आठवड्यातील मंत्रिमंडळ विस्तारात १९ नव्या मंत्र्यांचा समावेश झाला तर ५ मंत्र्यांना वगळण्यात आले. त्यामुळे मंत्रिमंडळ सदस्यांची एकूण संख्या ७८ वर गेली आहे. नव्याने समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांची सरासरी संपत्ती ८.७३ कोटी रुपये आहे. तर एकूण मंत्रिमंडळाची सरासरी संपत्ती १२.९४ कोटी आहे, असे असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या दिल्लीस्थित विचार गटाने म्हटले आहे.

नव्या मंत्र्यांमध्ये खासदार एम. जे. अकबर यांनी सर्वाधिक ४४.९० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्यानंतर पी. पी. चौधरी (३५.३५ कोटी), विजय गोयल (२९.९७ कोटी) यांचा क्रमांक लागतो. मोदींच्या ७८ मंत्र्यांपैकी ९ मंत्र्यांची संपत्ती ३० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यात अर्थमंत्री अरूण जेटलींचा (११३ कोटी रुपये) समावेश आहे.
नव्या मंत्र्यांपैकी ७ जणांविरुद्ध गुन्हेगारी खटले दाखल आहेत. त्यामुळे मोदी सरकारमध्ये गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या मंत्र्यांची संख्या २४ वर गेली आहे. ७८ मंत्र्यांपैकी १४ मंत्री १२ वी किंवा त्यापेक्षा कमी शिकलेले आहेत तर ६३ मंत्री पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...