आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 74 Year Old Man To Get Pension After 14 Year Wait. His Name Did Not Figure In BPL List

१४ वर्षाने मिळाले निवृत्तिवेतन; बीपीएलच्या यादीत नाव नसल्याने टाळाटाळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मदुराई- ७४ वर्षीय वेणुनाथन गेल्या १४ वर्षांपासून निवृत्तिवेतनाची प्रतीक्षा करत होते. दरवेळी त्यांना नकार ऐकावा लागत होता. दारिद्र्यरेषेखालील यादीत त्यांचे नाव नव्हते. त्यावर मदुराई खंडपीठाने वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यास दिलासा दिला. अखेर अनेक वर्षांच्या लढ्यानंतर त्यांच्या पदरी यश आले असून थकबाकीसह सर्व रक्कम देण्याचे आदेश कोर्टाने बजावले आहेत.
हे प्रकरण अगोदर मद्रास उच्च न्यायालयात दाखल झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास आव्हान दिले होते. त्यानंतर ते मदुराईच्या खंडपीठासमोर आले. न्यायमूर्ती एस. मणिकुमार आणि न्यायमूर्ती जी. चोकलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांची आव्हान याचिका फेटाळून लावली. दारिद्र्यरेषेखालील यादीत वेणुनाथन यांचे नाव नसल्यामुळे त्यांना निवृत्तिवेतनापासून वंचित ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. महसूल अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ७४ वर्षीय बुजुर्गाला दोषी ठरवता येऊ शकत नाही. बीपीएलच्या यादीत आपले नाव असावे, यासाठी एवढा वयस्कर माणूस येऊन अर्ज देईल, अशी अपेक्षा तरी कशी करता येईल? वेणुनाथन कोर्टासमोर हजर हाेऊन म्हणाले, मला तीन मुले आहेत. तिघेही रोजंदारीवर काम करतात. ते तिघांपैकी एकाकडे राहतात. त्यामुळेच त्यांचे नाव बीपीएलच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नव्हते.

खंडपीठाने नायब तहसीलदाराच्या अहवालाचा आधार घेत हा निवाडा केला. त्यात सदर वयोवृद्ध कर्मचाऱ्याचा आर्थिक स्तर कमकुवत असल्याचे नमूद करण्यात आले होते. दरम्यान, वयोवृद्ध कर्मचाऱ्याला सरकारी पातळीवरून दिली जाणारी वागणूक किती अपमानास्पद आणि संतापजनक होती, हे या प्रकरणातून उजेडात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...