आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील ७५ जणांना देशभरात पाेलिस सुरक्षा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह महाराष्ट्रातील ७५ अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, न्यायाधीश यांना झेड प्लस, झेड, वाय अाणि एक्स या चार प्रकारची सुरक्षा देशभर उपलब्ध करून देण्याचा अादेश केंद्र सरकारने नुकताच काढला अाहे. यात ठाकरे कुटुंबातील सर्वच प्रमुख व्यक्तींचा समावेश अाहे.
मुख्यमंत्री, राज्यपालांसह संपूर्ण ठाकरे परिवाराचा समावेश
झेड प्लस सुरक्षा : राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विशेष सरकारी वकील उज्ज्वलकुमार निकम अाणि निवृत्त लेफ्ट. जनरल के. एस. ब्रार.

झेड सुरक्षा : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शास्त्रज्ञ डाॅ. रतनकुमार सिन्हा, अणुऊर्जा आयोगाचे (एईसी) माजी अध्यक्ष डाॅ. अार. चिदंबरम,

भाभा अॉटाेमिक रिसर्च सेंटरचे (बार्क) माजी संचालक डाॅ. एस. बॅनर्जी, ‘बार्क’चे माजी अध्यक्ष डाॅ. अनिल काकाेडकर, अमेरिकेचे काॅन्सुल जनरल थाॅमस वाजदा, इस्रायलचे डेव्हिड अकाेव, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, लाेकअायुक्त एम. एल. तहलियानी, एईसीचे अध्यक्ष एस. बसू, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, िवशेष सरकारी वकील राजा ठाकरे, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास अाठवले, ‘बार्क’चे संचालक के.एन. व्यास, गडचिराेलीचे जिल्हाधिकारी अमगाेथू श्रीरंग नाईक अाणि केवळ नक्षल भागासाठी माजी अामदार धर्मराव बाबा अात्राम यांना.

एक्स सुरक्षा : राज्यपाल राव यांच्या पत्नी विनाेदा, मुख्यमंत्री फडणवीसांची पत्नी अमृता, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा, उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी, पुत्र अादित्य अाणि तेजस, अामदार अबू अाझमी, माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण, नारायण राणे, मंत्री रामदास कदम, अभिनेता अमिताभ बच्चन, खासदार संजय राऊत, बार्कचे शास्त्रज्ञ डाॅ. व्ही. के. गुप्ता, गायिका लता मंगेशकर, अायबीचे माजी संचालक व्ही. जी. वैद्य, खासदार अशाेक नेते, विशेष सरकारी वकील दीपक साळवी, माजी खासदार माराेतराव काेवासे, विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे, सामाजिक कार्यकर्ते दत्तप्रसाद दाभाेलकर, खा. संभाजीराजे छत्रपती, माजी उपसभापती वसंत डावखरे, गडचिराेलीचे न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, निवृत्त न्यायाधीश यतीन शिंदे, पी.डी. काेदे, अाैरंगाबादचे एसपी नवीनचंद्र रेड्डी, उपसभापती माणिकराव ठाकरे, माेक्काचे विशेष न्यायाधीश श्रीकांत अणेकर.
वाय सुरक्षा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राेमानियाचे माजी दूत जे. एफ. रिजिराे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अार. व्ही. माेरे, मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप, माजी मंत्री एकनाथ खडसे (गार्डसह), वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार (नक्षल जिल्ह्यात झेड, अन्यत्र वाय), गडचिराेलीचे अामदार देवराव हाेळी (केवळ गडचिराेली), अादिवासी िवकास राज्यमंत्री अंबरीशराव अात्राम ( नक्षल भागात झेड, अन्यत्र वाय), अारमाेरीचे अामदार क्रिष्णा गजबे (गडचिराेली व गाेंिदया केवळ), विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा मंत्री राम शिंदे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडाेले ( नक्षल विभाग), खासदार श्रीकांत शिंदे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे (गार्डसह), विशेष सरकारी वकील अजय मिसर (गार्डसह), अामदार गाेपालदास अग्रवाल (केवळ नागपूर विभाग), गृह राज्यमंत्री दीपक केसरकर (गार्डसह), हाेमगार्डचे राकेश मारिया (गार्डसह), निवृत्त अायपीएस अधिकारी के.पी. रघुवंशी (गार्डसह), खासदार प्रफुल पटेल, अामदार जितेंद्र अाव्हाड, मुंबई जिल्हा सहकारी काे-अाॅप. बँकेचे संचालक प्रसाद लाड.
बातम्या आणखी आहेत...