आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७५ टक्के फाशीच्या शिक्षा गरिबांनाच, फाशीच्या शिक्षेवर प्रश्‍नचिन्ह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजप खासदार वरुण गांधी यांनी फाशीच्या शिक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात त्यांनी म्हटले की, ७५ टक्के फाशीच्या शिक्षा गरिबांना मिळाल्या आहेत.

२०१४ मध्ये भारतीय न्यायालयांनी ६४ दोषींना फाशीच्या शिक्षा सुनावल्या. यामुळे फाशीची शिक्षा सुनावणा-या ५५ देशांच्या यादीत भारत टॉप १० मध्ये आहे. त्यांनी १९८३ मध्ये ‘दुर्मिळात दुर्मिळ’ प्रकरणांतच फाशी देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचेही विश्लेषण केले.