आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च शिक्षणासाठी मासिक 75 हजारांची शिष्यवृत्ती; पायाभूत सुविधा पुरवण्यास सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठी शिष्यवृत्ती योजना आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी महिन्याला ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळेल, अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.  
 
आम्ही प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. त्यावर मंत्रिमंडळाकडून अगोदरच हिरवा कंदील मिळाला आहे. लवकरच त्याला अंतिम रूप देण्यात येणार आहे. सरकारने हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर आयआयटी आणि विद्यापीठांच्या पायाभूत सुविधांसाठीदेखील सरकारने मदत पुरवण्यास सुरुवात केली आहे, असे जावडेकर यांनी सांगितले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) येथे सुमंत सिन्हा रिन्यू सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उद््घाटनप्रसंगी जावडेकर मंगळवारी बोलत होते.  

देशात पहिल्यांदाच १ हजार जणांना लाभ 
देशातील विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांत उच्च शिक्षणात आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. त्याचा लाभ १ हजार विद्यार्थ्यांना मिळणार आहे. भारतात एवढी मोठी मासिक शिष्यवृत्ती देण्याची ही पहिलीच वेळ आहे. महिन्याला ७५ हजार रुपये देणे ही सामान्य बाब नाही. आम्हाला ब्रेनड्रेनची समस्या संपवायची आहे, असे प्रकाश जावडेकर म्हणाले.  

अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रावर भर  
देशात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील उच्चस्तरीय शिक्षणाला सरकारने प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पीएच.डी.सारख्या पातळीवर विविध योजना आणण्याचे सरकारने ठरवले आहे, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.  

आयआयटीमधील मुलींचा टक्का वाढणार  
आयआयटीमध्ये मुलींची सध्याची टक्केवारी ८ टक्के आहे. ती २०२२ पर्यंत २० टक्क्यांवर नेण्यात येईल, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. उच्च शिक्षणातील संशोधन प्रकल्पाला गती देण्याचीदेखील सरकारची योजना आहे. त्यासाठी २ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.  
बातम्या आणखी आहेत...