आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचाराच्या तक्रारी ७९ टक्क्यांनी वाढल्या; केंद्रीय दक्षता आयाेगाचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात भ्रष्टाचारविरोधी आंदाेलन आणि संतापाचे पडसाद सरकारी पातळीवरदेखील दिसू लागले आहेत. त्यामुळेच भ्रष्टाचाराच्या तक्रारींची संख्या कमालीची वाढल्याचा दावा केंद्रीय दक्षता आयोगाकडून करण्यात आला आहे. २०१३ च्या तुलनेत गेल्या वर्षी हे प्रमाण ७९ टक्क्यांनी वाढल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

भ्रष्टाचार प्रतिबंधक निगराणी संस्था म्हणून काम करणाऱ्या सीव्हीसीने तक्रारींची आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी ६३ हजार २८८ तक्रारी मिळाल्या. त्याच्या मागील वर्षी मात्र अशा तक्रारींचे प्रमाण ३५ हजार ३३२ एवढे होते. समाजात जागल्याचे काम करणारे आणि काही निनावी, असे तक्रारदारांचे स्वरूप आहे.
वर्ष आणि तक्रारींची संख्या
>२०१२ ३७, ० ३९.
>२०११ १६, ९२९.
>२०१० १६, २६०.
> २००९ १४, २०६
> २००८ १०,१४२.
>२००७ ११,०६२.
> २००६ १०, ७९८.
> २००५ ९,३२०.
> २००४ १०,३७५.
> २००३ ११, ३९७.