आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7th Pay Commission Could Submit Its Report On 20th November

सातवा वेतन आयोग : 20 नोव्हेंबरला अहवाल सोपवणार! 15 % वाढीची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सातव्या वेतन आयोगाचा अहवाल 20 नोव्हेंब्रला केंद्र सरकारला सोपवला जाण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टसमध्ये तसा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार आयोग अर्थमंत्री अरुण जेटली यांना अहवाल सोपवणार आहे. या रिपोर्टद्वारे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉइजना पगारामध्ये 15% वाढ देण्याची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे. 900 पानांचा हा अहवाल मंजूर झाला तर केंद्राचे 48 लाख कर्मचारी आणि 55 पेन्शनर्स यांना फायदा होऊ शकतो.

केव्हापासून लागू होणार?
> आयोगाच्या शिफारसी सरकारला 1 जानेवारी 2016 पासून लागू करायच्या आहेत.
> 31 डिसेंबरपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
> आयोगाचे अध्यक्ष अशोक कुमार माथूर, सेक्रेटरी मीना अग्रवाल, सदस्य डॉ. राथिन राय आणि विवेक राक यांनी हा अहवाल तयार केला आहे.
> या आयोगाची स्थापना यूपीए सरकारने फेब्रुवारी 2014 मध्ये केली होती. त्याला 18 महिन्यांत अहवाल सादर करायचा होता. पण त्याची मुदत ऑगस्ट 2015 पर्यंत चार महिन्यांनी वाढवण्यात आली होती.

कशा असतील नव्या शिफारसी...
दैनिक भास्करने यापूर्वी सप्टेंबरमध्येच सांगितले होते की, कमिशन त्यांच्या रिपोर्टमध्ये दरवर्षी जुलै महिन्यात पदोन्नगी आणि 15 % ते ३ पट पगारवाढ देण्याची शिफारस करू शकते.
>अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सॅलरीमध्ये दरवर्षी 1 जुलैला पगारवाढीचा प्रस्ताव आहे.
>IAS, IPS आणि IRS यांचे पगार एका रांगेत आणले जाऊ शकतात. त्यामुळे IPS, IRS अधिकाऱ्यांची पगार कमी मिळण्याची तक्रार दूर होऊ शकते.
> सध्या कर्मचाऱ्यांना 32 पे-बँड आहे. ते घटवून 13 करण्याचा प्रस्ताव आहे. तसे झाल्यास IAS, IPS आणि IRS यांचे पे-बँड एका स्तरावर येतील.