आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7th Pay Commission: Up To 15% Salary Recommendation For The Employees

सातवा वेतन आयोग: कर्मचाऱ्यांना १५ टक्‍क्‍यां पर्यंत वेतनवाढीची शिफारस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सातवा वेतन आयोग गुरुवारी आपला अहवाल अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सोपवेल, अशी शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयोगाने १५% वेतनवाढीची शिफारस केली आहे. त्याचा फायदा ४८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५५ लाख सेवानिवृत्तांना होईल.

सहाव्या वेतन आयोगामुळे २००८ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३५ % वाढ झाली होती. त्या तुलनेत नव्या शिफारशी अर्ध्याहूनही कमी आहेत. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. के. माथूर यांनी सांगितले की, ‘आम्ही अहवाल तयार केला आहे. आम्ही तो १९ नोव्हेंबरला सोपवू.’ यूपीए सरकारने फेब्रुवारी २०१४ मध्ये सातव्या वेतन आयोगाचे गठन केले होते. आयोगाला अहवालासाठी ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण केंद्र सरकारने आयोगाचा कार्यकाळ चार महिने वाढवून डिसेंबरपर्यंत केला होता. आयोगाच्या शिफारशींवर केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शिक्कामोर्तब झाल्यावर एक जानेवारी २०१६ पासून तो लागू होईल.
२५ हजार कोटींचा बाेजा
सरकारने आयोगाच्या पूर्ण शिफारशी स्वीकारल्या तर तिजोरीवर २५ हजार कोटींचा अतिरिक्त भार पडेल. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचनुसार, ही रक्कम भारताच्या जीडीपीच्या ०.२% आहे. या वेतनवाढीमुळे अर्थव्यवस्था मजबूत व स्वस्त घरे, कार, दुचाकी वाहने आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीत वाढ होऊ शकेल, अशी आशा अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, महागाई व महसुली तूट वाढण्याची शंकाही आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, काय आहे शिफारस...