आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातनिहाय जनगणनेच्या अहवालात तब्बल ८.१९ कोटी चुका!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जातनिहाय जनगणनेच्या अहवालात तब्बल ८.१९ कोटी चुका आहेत. त्यामुळे हा अहवाल जारी करण्यात आला नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ६९. १ लाख चुका महाराष्ट्राच्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जातनिहाय जनगणनेत ८,१९,५८,३१४ चुका असून राज्यांना त्या सुधारण्यास सांगितले आहे. राज्यांनी ६.७३ कोटी चुका दुरुस्तही केल्या आहेत. परंतु अजूूनही १.४५ कोटी चुकांची दुरुस्ती बाकी आहे. १६ जुलै रोजी सरकारने या अहवालाचे अवलोकन केले आहे. त्यात ४६ लाख ७३ हजार ३४ जाती आणि उपजाती असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी केंद्राने जातनिहाय जनगणना अहवाल जारी करण्यावर बंदी घातली होती.