आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएफ ठेवींवर आता मिळेल 8.65% व्याज, वित्त मंत्रालयाकडून व्याजदराला मंजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (पीएफ) ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. वित्त मंत्रालयाने नुकतीच या व्याजदराला मंजुरी दिली असून आता याबाबत कसलाही संभ्रम नसल्याची माहिती कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी मंगळवारी दिली.  

दत्तात्रय यांनी सांगितले, चालू आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर ८.६५ टक्के व्याज देण्यावर श्रम मंत्रालय आणि वित्त मंत्रालय यांचे एकमत झाले. सध्या ही प्रक्रिया सुरू असून मी त्यावर व्यक्तिश: लक्ष ठेवणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर व्याजदर ठरवणारी शिखर संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या दत्तात्रय यांच्या अध्यक्षतेखाली १९ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत पीएफवर ८.६५ टक्के व्याज देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर पीएफवर अल्प बचतीप्रमाणे व्याजदर आकारावेत का, अशी विचारणा वित्त मंत्रालयाकडून सातत्याने होत होती. 
 
चार वर्षांतील सर्वात कमी व्याज 
ईपीएफओने २०१५-१६ मध्ये पीएफवर ८.८ टक्के व्याज दिले होते. त्यापूर्वी २०१३-१४ मध्ये पीएफवर ८.७५ टक्के तर २०१४-१५ मध्ये ८.५ टक्के व्याज मिळत होते. वित्त मंत्रालयाने २०१५-१६ मध्ये पीएफवर ८.७ टक्के व्याज दिले होते. चालू आर्थिक वर्षात २०१६-१७ साठी आता ८.६५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. हा मागील चार वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहे. 
बातम्या आणखी आहेत...