आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील स्टार्टअप्सच्या ८०० कंपन्या पडल्या बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात बंद पडणाऱ्या स्टार्टअप्सची यादी वाढतच चालली आहे. मागील तीन ते चार वर्षांच्या दरम्यान जवळपास ८०० टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स बंद पडले किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परंतु औद्योगिक धोरण संवर्धन विभागाचे संयुक्त सचिव शैलेंद्र सिंह यांच्या मते, डॉट कॉम क्षेत्र उत्तम कामगिरी करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्याचा काळ कठीण असला तरी याला खराब म्हणता येणार नाही.

डाटा विश्लेषण करणाऱ्या फर्म ट्रेक्झेन टेक्नॉलॉजीजने २०११ च्या नंतर बंद पडणाऱ्या स्टार्टअप्सची यादी बनवली आहे. २००० च्या सुरुवातीला एका वेबसाइटने बंद पडणाऱ्या डॉट कॉम कंपन्यांची अशीच एक यादी बनवली होती. याला डॉट कॉम डेडपूल असे नाव देण्यात आले. आता ट्रेक्झेनच्या यादीला स्टार्टअप्स डेडपूल म्हटले जात आहे. ट्रेक्झेननुसार, ५.१२ कोटी डॉलरचा निधी मिळाल्यानंतरही ग्रोसर स्टोअर पीपरटेपने व्यवसाय बंद केला होता. फॅशन अक्सेसरीज ऑनलाइन स्टोअर बी स्टाइलिशनेही व्यवसाय बंद करून या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यालासुद्धा एक कोटी डॉलरचा निधी मिळाला होता. स्टार्टअप्स अपयशी का ठरत आहेत, याचे कारण जाणून घ्यायचे असेल तर अहवालाचा विस्तृत अभ्यास करावा लागेल, असे सिंह यांनी म्हटले. जागतिक बाजारात मंदी असल्याने स्टार्टअप्स त्यांची क्षमता वाढवू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. सचिवांच्या मते, ८०० स्टार्टअप्स बंद होणे म्हणजे चिंतेची बाब नाही. ही एक लघुकथा आहे. तर ट्रेक्झेनचे म्हणणे आहे की, जागतिक मंदीमुळे क्षमता वाढवणे अशक्य होत असल्याने स्टार्टअप्स बंद होण्याचे संभाव्य कारण होऊ शकते. स्पर्धा वाढल्याने ई-कॉमर्स आणि फूड टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सच्या डिजिटल मार्केटिंगचा खर्च वाढला आहे.
बातम्या आणखी आहेत...