आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

84th एअरफोर्स डे: एअर शोमध्ये पहिल्यांदा दिसले \'तेजस\'; वायुसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर इंडियन एअरफोर्सचा '84th फाउंडेशन डे' उत्साहात साजरा करण्यात आला. एअर शोमधून वायुसेनेने चित्तथरारक कसरती करत जोरदार शक्तिप्रदर्शनही केले. भारतीय बनावटीचे 'तेजस फायटर जेट'चा पहिल्यांदा एअर शोमध्ये समावेश करण्यात आला. परेडच्या सुरुवातीला 12 पॅराजंपर्सनी आठ हजार फूट उंचीवरुन ग्राउंडवर उडी घेतली.

84th एअरफोर्स फाउंडेशन डे निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ट्वीट' करून शुभेच्छा दिल्या आहेत. एअरफोर्स चीफ अरूप राहा यांच्यासोबत आर्मी आणि नेव्ही चीफ यावेळी उपस्थित होते. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर देखील यावेळी उपस्थित होता. सचिन तेंडूलकर एअरफोर्सचा मानद ग्रुप कॅप्टन आहे. सचिन यापूर्वीही परेडमध्ये दिसला होता.

83 वर्षे पुरातन 'टायगर मोथ' अवकाशात झेपावले...
- फ्लाय पास्टमध्ये सुखोई, मिराज, जग्वार, मिग-21सह तेजस फायटर जेटने पहिल्यांदा एअर शोमध्ये सहभाग घेतला.
- 83 वर्षांपेक्षा जास्त जुने विंटेज एअरक्राफ्ट 'टायगर मोथ'ने अवकाशात झेप घेऊन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
- ध्रुव हेलिकॉप्टर्सच्या सारंग टीमने चित्तथरारक कसरती दाखवल्या.
- सूर्या किरण अॅरोबॅटिक टीम (SKAT), तीन Mi-17 V5 हेलिकॉप्टर्स आणि तीन हरक्यूलस C-130J एअर शोमध्ये सहभाग नोंंदवला.
- एअरशोपूर्वी जवानांची परेड झाली. एअरफोर्स चीफ यांच्या हस्ते जवांनाना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- एअर वॉरियर ड्रिल टीमने शादनार कर्तब दाखवून उपस्थितांनचे मन जिंकून घेतले.
- 36 रॉफेल विमानांनी लवकरच एअरफोर्सची ताकद वाढवली जाणार असल्याचे एअरफोर्स चीफ यांनी सांगितले.
- दरम्यान भारतीय वायूदलाची स्थापना (IAF) 8 ऑक्टोबर, 1932 रोजी झाली होती.

पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ आणि किती शक्तिशाली आहे आपले एअरफोर्स?
बातम्या आणखी आहेत...