आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीनंतर 9 लाख बँक खाती संशयित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर बँक खात्यात मोठ्या रकमा जमा करणारे किमान ९ लाख लोक सध्या संशयाच्या फेऱ्यात आहेत. या खात्यांत किमान ५ लाख रुपये जमा झाले होते. मात्र, रोख काळा पैसा घोषित करण्याची पंतप्रधान गरीब कल्याण योजना ३१ मार्चपर्यंत असल्याने या लोकांवर मार्चनंतरच कारवाई होणार आहे.
 
संशयास्पद १८ लाख खातेदारांपैकी ५.२७ लाख लोकांनी त्यांना ई-मेल किंवा एसएमएसद्वारे पाठवण्यात आलेल्या प्राप्तीकर विभागाच्या नोटिसांना उत्तर दिलेले नाही. कदाचित हे लोक आता प्राप्तीकर परताव्यांमध्ये याबाबत  सविस्तर उल्लेख करतील. मात्र, केवळ परतव्यांमध्ये उल्लेख केला म्हणजे ती रक्कम वैध मानली जाईल, असे नव्हे. यापूर्वीही अशा खात्यांवर मोठ्या रकमा खात्यावर जमा झालेल्या  असल्या पाहिजेत.
बातम्या आणखी आहेत...