आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 फूट बर्फातून 6 दिवसांनी जवानाला वाचवले, आई म्हणाली- तो येणारच होता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बचाव पथकादरम्यान बर्फाखालून मृतदेह मिळाला. हे छायाचित्र लष्कराने जारी केले आहे. - Divya Marathi
बचाव पथकादरम्यान बर्फाखालून मृतदेह मिळाला. हे छायाचित्र लष्कराने जारी केले आहे.
नवी दिल्ली/ जम्मू- सियाचिनमध्ये तब्बल 25 फूट बर्फ कापून एका जवानाला तब्बल सहा दिवसांनंतर जिवंत बाहेर काढण्यात आले. लान्स नायक हनमनतप्पा असे या जवानाचे नाव आहे. नऊ जवानांचे मृतदेह देखील बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात जाऊन हनमनतप्पा यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

3 फेब्रुवारी रोजी हिमकडा कोसळल्याने एक ज्यूनियर कमीशन ऑफिसरसह 10 जवान बर्फाखाली गाडल्या गेले होते. या घटनेनंतर लष्कराने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. त्यानंतर सर्व जवान शहीद झाल्याचे सांगितले जात होते.

गेल्या सहा दिवसांपासून बचावकार्य अविरत सुरू आहे. लष्कर आणि हवाई दलाचे जवान मृतदेह शोधण्यात गुंतले आहेत. 19,500 फूट उंचीवरील चौकीत एका जेसीओसह नऊ जवान तैनात होते. सर्व जवान बेपत्ता आहेत.
मद्रास रेजिमेंटचे जवान
- हिमवादळात बर्फाखाली दबले गेलेले जवान मद्रास रेजिमेंटचे होते. लष्कराने शुक्रवारी बेपत्ता जवानांची नावे जाहीर केली होती.
- स्पेशल साधने आणि स्नायफर डॉगच्या मदतीने बेपत्ता जवानांचा शोध घेतला जात आहे.
- ठिकठिकाणी 25 ते 30 फुट जाडीचा बर्फ कापून लान्स नायक हनमनतप्पा याला बाहेर काढण्यात आले.
- लष्कराचे कमांडर डी. एस. हुड्डा यांनी सांगितले, की पाच जवानांचे मृतदेह सापडले आहेत. त्यातील चार जणांची ओळख पटविण्यात आली आहे.
- बचाव अभियान सुरु असलेल्या ठिकाणी शेजारी एक तात्पूरता कॅम्प लावण्यात आला आहे.
- अखेरचा जवान सापडेपर्यंत बचाव अभियान राबविले जाईल, असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले आहे.
काय म्हणाली आई आणि पत्नी
- धारवाड जिल्ह्यातील कुंडागोला तालुक्यात बेतादुर या गावी हनमनतप्पा यांचे घर आहे.
- हनमनतप्पा जिवंत असल्याचे वृत्त समजल्यावर त्यांचे कुटुंब अत्यंत भावूक झाले.
- आई म्हणाली, की तो माझ्या स्वप्नात आला होता. मी परत येईल असे म्हणाला होता.
- पत्नी म्हणाली, मी खुप आनंदी आहे. आम्हाला पुर्नजन्म मिळाला. त्यांना बघायला जायचे आहे.
हनमनतप्पा यांची प्रकृती गंभीर
- त्यांना विशेष विमानाने दिल्लीला आणण्यात आले आहे. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
- उणे 40 डिग्री तापमानात ते गेल्या सहा दिवसांपासून दबले होते.
- त्यांना लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे.

शहीद जवानांची नावे...
1) सुभेदार नागेश टीटी (गाव तेजुर, हासन, कर्नाटक)
2) हवलदार एलुमलाई एम (दुक्कम पराई, वेल्लौर, तमिळनाडू)
3) लान्स नायक एस कुमार (कुमानन थोजू, तेनी, तमिळनाडू)
4) लान्स नायक सुधीश बी (मोनोरोएथुरुत , कोल्लम, केरळ)
5) कॉन्स्टेबल महेश पी.एन. (एचडी कोटे, मैसूर, कर्नाटक)
6) कॉन्स्टेबल गणेशन जी (चोक्काथीवन पट्टी, मदुरै, तमिळनाडू)
7) कॉन्स्टेबल राम मूर्ती एन (गुडिसा टाना पल्ली, कृष्णा गिरी, तमिळनाडू)
8) कॉन्स्टेबल मुश्ताक अहमद (पारनापल्लै, कुरनूल, आंध्र प्रदेश)
9) कॉन्स्टेबल नर्सिंग असिस्टेंट सूर्यवंशी एस. व्ही. (मसकरवाड़ी, सातारा, महाराष्ट्र).

पुढील स्लाइडवर पाहा, असे राबविले जात आहे बचाव अभियान... बघा व्हिडिओ... संबंधित फोटो....