आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीच्या नऊ वर्षीय मुलीवर प्रियकराकडून बलात्कार; त्यानंतर केले ब्लेडने वार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ल‍ी- संपूर्ण देशाला हादरून टाकणार्‍या राजधानीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी ठरवलेल्या चारही नराधमांचा आज (बुधवार) साकेत कोर्टात फैसला होणार आहे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षेची मागणी होत असताना दिल्लीतील उस्मानपूर येथे एका अल्पवयीन मुलीवर तिच्या आईच्या प्रियकरानेच बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. एवढेच नाही तर नराधमाने मुलीच्या गुप्तांगावरही ब्लेडने वार केले आहे. पीडित मुलगी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत तिच्या नातेवाईकांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या वडीलांनी तिला रुग्णालयात दाखल केले आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पीडित मुलीच्या वडीलांनी पोलिसांना सांगितले की, संजय नामक एका व्यक्तींचे त्याच्या पत्नीसोबत अवैध संबंध आहेत. संजय यानेच मुलीवर अत्याचार केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.