आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 90% Indians Oppose BJP's PM Nominee Narendra Modi: Javed Akhtar

नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीला 90% भारतीयांचा विरोध, जावेद अख्तर यांचे वादग्रस्त वक्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना विरोध करणे हे देशद्रोह करण्यासारखे असल्याचे काही मुर्खांचे मत आहे, असे वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीला तब्बल 90% भारतीयांचा विरोध आहे, असेही अख्तर यांनी म्हटले आहे.
जावेद अख्तर यांच्या वक्तव्याने राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे. ट्विटर या वेबसाईटवर अख्तर म्हणाले, की काही मुर्खांना असे वाटते, की नरेंद्र मोदी यांना विरोध करणे हे राष्ट्रविरोधी काम आहे. अशा लोकांना असे सांगायचे आहे काय, की तब्बल 90% भारतीय देशद्रोही आहेत.
आक्षेपार्ह संदेश पाठविणाऱ्यांवर गेल्या महिन्यात जावेद अख्तर यांनी कठोर टीका केली होती. यावेळी त्यांनी ट्विटरवर लिहिले होते, की जशा प्रकारचे संदेश मोदीच्या चाहत्यांकडून मला मिळत आहेत, त्यावरून त्यांच्या समर्थकांचा दर्जा दिसून येतो.
जावेद अख्तर आणि नरेंद्र मोदी समर्थकांमध्ये कशी सुरू झाली कुजबुज वाचा पुढील स्लाईडवर