नवी दिल्ली/औरंगाबाद - शनिवारी पहाटे रिमझिम पावसाने औरंगाबादकर सुखावले आहेत. मात्र, देशात अजूनही अनेक ठिकाणी मान्सूनचे आगमन झालेले नाही. महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यानंतरही महाराष्ट्रातील मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद जून अर्धा संपल्यानंतरही कोरडे होते. आज पहाटे काही मिनिटे झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र देशातील अनेक भागात अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. महाराष्ट्रात येत्या सोमवारपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.
नॉर्थ इंडिया अजून कोरडा, केवळ 15% पाणीसाठा शिल्लक
उत्तर भारतात अजूनही मान्सूनचे दमदार आगमन झालेले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. देशातील 91 मोठ्या धरणांमध्ये फक्त 15% पाणीसाठा शिल्लक आहे. याचा परिणाम फक्त खरिपावर होणार नसून पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीपाच्या पेरणीमध्ये 10% घट झाली आहे.
महत्त्वाच्या जलसाठ्यांमध्ये कमी झाले पाणी
- देशातील महत्त्वाच्या धरणांमध्ये 26 मे रोजी 26.81 बिलियन क्यूबिक मीटर (बीसीएम) पाणी होते. 16 जूनपर्यंत त्यात घट होऊन 23.78 बीसीएम राहिले आहे.
- ही आकडेवारी शुक्रवारी सेंट्रल वॉटर कमिशनने प्रसिद्ध केली आहे.
- त्यांचे म्हणणे आहे, की याचा परिणाम फक्त खरिपावर होणार नसून पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची शक्यता आहे.
- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीपाच्या पेरणीत 10 टक्के घट झाली आहे.
- गेल्या वर्षी 17 जूनपर्यंत 93.63 लाख हेक्टरमध्ये खरीपाची पेरणी झाली होती. यंदा मात्र 84.21 लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.
- तज्ज्ञांचे मत आहे की येत्या चार-पाच दिवसांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन झाले नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.
दक्षिण भारतातील जलसाठ्यांची स्थिती सर्वात वाईट
- वॉटर कमीशनच्या आकडेवारीनुसार, दक्षिण भारतातील 31 जलसाठ्यांमध्ये फक्त 4.86 बीसीएम पाणी शिल्लक आहे. हे एकूण क्षमतेच्या फक्त 9% आहे.
- दुसरीकडे उत्तर भारतातील स्थिती थोडी बरी आहे. येथे 6 मोठ्या जलसाठ्यांमध्ये 23% पाणीसाठा शिल्लक आहे.
- सेंट्रल वॉटर कमिशनने ज्या 91 जलसाठ्यांचा अभ्यास केला त्यात 27 पश्चिम भारतातील, 15 पूर्वेकडील आणि 12 मध्य भारतातील आहेत.
- कमिशनने ज्या धरणांचा अभ्यास केला त्यात महाराष्ट्रातील कोयना आणि अपर वैतरणा यांच्यासह गोविंद सागर (भाकरा), हिमाचलमधील पोंग, पंजाबातील थीन, राजस्थानमधील राणा प्रताप सागर, झारखंडमधील पंचेत हिल, ओडिशामधील हीराकुंड आणि अपर इंद्रावती, गुजरातमधील उकाई आणि सरदार सरोवर यांचा समावेश होता.
दुष्काळामुळे जलसाठे आटले
- जलसाठ्यांमधील पाणी कमी होण्याला सलग दोन वर्षांपासून असलेला दुष्काळ कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
- 2014 मध्ये जिथे 12% पाऊस कमी पडला तिथे 2015मध्ये 14% पाऊस कमी पडला.
- तामिळनाडूमधील धरणे ऑक्टोबर-डिसेंबर मध्ये मॉन्सूनच्या पावसाने भरतात.
पुढील स्लाइडमध्ये, भारतात कोणत्या प्रदेशात काय आहे स्थिती
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)