आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्वच्छ भारत'च्या जाहिरातीवर वर्षभरात ९४ कोटी रुपये खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्वच्छ भारत माेहिमेवर वर्षभरात ९४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यूपीए सरकारच्या निर्मल भारत अभियानाची ही सुधारित आवृत्ती आहे.

माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नावर पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने दिलेल्या माहितीत सरकारने जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी वर्षभरात २.१५ कोटी रुपये केल्याचे सांगितले. ७०.८० लाख रुपये वृत्तपत्रांतील जाहिरातींवर तर ४३.६४ कोटी रुपये ऑडिओ व्हिज्युअल जाहिरातींवर खर्च करण्यात आले. डीएव्हीपीच्या माध्यमातून दूरचित्रवाणी वाहिन्यांवर २५.८८ कोटी रुपये खर्च केले. दूरदर्शन आणि रेडिओसाठी अनुक्रमे १६.९९ कोटी व ५.४२ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय स्वच्छ भारत अभियान राबवते. यूपीए सरकारच्या काळात निर्मल भारत अभियानाद्वारे योजना सुरू होती. या योजनेअंतर्गत राज्यांना तांत्रिक आणि आर्थिक मदत दिली जात असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली. लखनऊचे आरटीआय कार्यकर्ते संजय शर्मा यांनी याबाबत माहिती मागवली होती. या अभियानातील निधी जिल्हा प्रशासनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जातो. ग्रामीण भागातील जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे अभियानाच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले. त्यासाठी स्वच्छतेला चालना दिली जात आहे.

ग्रामीण भारत लक्ष्य
पंतप्रधान मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी अभियानाचा शुभारंभ केला. पाच वर्षांत संपूर्ण मोहिमेवर २ लाख कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. ग्रामीण भागात २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छतेच्या सुविधा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.